ETV Bharat / entertainment

जॉन अब्राहम, बॉबी देओल आणि अर्जुन रामपालची हाऊसफुल फ्रँचायझीमध्ये पुन्हा एन्ट्री - Housefull 5 Movie

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 5:19 PM IST

बॉबी देओल अर्जुन रामपाल आणि जॉन अब्राहम यांनीही अक्षय कुमार आणि रितेश देशमुख स्टारर 'हाऊसफुल 5' मध्ये प्रवेश केला आहे. फ्रँचाइझीच्या आधीच्या चित्रपटातील कलाकारांना पुन्हा संधी मिळत असली तरी अनिल कपूर या चित्रपटाचा भाग असणार नाही.

John Abraham, Bobby Deol and Arjun Rampal
जॉन अब्राहम, बॉबी देओल आणि अर्जुन रामपाल ((IANS))

मुंबई - बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख 'हाऊसफुल 5' या मल्टीस्टारर चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. याशिवाय आता बॉबी देओल आणि जॉन अब्राहम यांनीही कॉमेडीचा डबल डोस देण्यासाठी चित्रपटात एन्ट्री केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन रामपाल 'हाऊसफुल 5'मध्ये देखील दिसणार आहे. फ्रँचायझीच्या आधीच्या रिलीज झालेल्या चित्रपटांतील कलाकारांना एकत्र आणलं जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

'हाऊसफुल 5' कास्टिंगमध्ये अर्जुन, जॉन, बॉबीचा सहभाग

अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम आणि बॉबी देओल यांनी फ्रेंचायझीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात लोक चांगले आणि वाईट अशा दोन गटात विभागले जातील. फ्रँचायझीमध्ये दुहेरी भूमिका साकारणारा चंकी पांडे सध्या चर्चेचा विषय आहे. महिला कलाकारांमध्ये जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी आणि लारा दत्ता यांचाही समावेश आहे. अनेक लोकप्रिय कलाकारही सहाय्यक भूमिकेत आहेत.

क्रूझवर चित्रपटाचं शूटिंग

चित्रपटातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग क्रूझवर करण्यात आलं आहे. ऑगस्टमध्ये लंडनमध्ये शूटिंग केल्यानंतर क्रू आणि कलाकार स्कॉटलंड, आयर्लंड, फ्रान्स आणि स्पेन व्यतिरिक्त या चित्रपटाचे शूटिंग इंग्लंडच्या न्यूकॅसलमध्ये होणार आहे. चित्रपटात मोठ्या प्रमाणात बॉलिवूडमधील ए-लिस्ट कलाकार काम करणार असल्यानं कोणतीही कसर राहणार नाही यांची काळजी दिग्दर्शक तरुण मनसुखानीला घ्यायची आहे.

अनिल कपूर या चित्रपटाचा भाग असणार नाही

अनिल कपूर या चित्रपटातील भूमिकेसाठी चर्चेत असल्याची चर्चा होती. पण आता तो प्रॉडक्शनशी संबंधित नसल्याची बातमी आहे. याचा अर्थ अनिल 'हाऊसफुल 5' चा भाग असणार नाही, असं सांगितलं जातंय.

हेही वाचा -

'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी,आक्षेपार्ह संवाद हटवण्याचे निर्देश - Hamare Baarah Movie

शोभना चंद्रकुमार दिसणार 'मरियम'च्या भूमिकेत, 'कल्की 2898 एडी'चं नवीन पोस्टर रिलीज - Kalki 2898 AD

राहुल मोदीनं चोरलं श्रद्धा कपूरचं हृदय? शक्ती कपूरच्या मुलीची 'उडलीय' झोप!! - Shraddha Kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.