ETV Bharat / entertainment

जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर 'पंचायत 3'च्या ट्रेलरची तारीख आली समोर - Jitendra Kumar and neena gupta - JITENDRA KUMAR AND NEENA GUPTA

Panchayat 3 :'पंचायत 3'चा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. या वेब सीरीजची वाट आता अनेकजण पाहात आहेत. आता पुन्हा एकदा फुलेरा गावामधील पलटण प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज झाली आहे.

Panchayat 3
पंचायत 3 (theviralfever (instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 10:55 AM IST

मुंबई -Panchayat 3 : अभिनेता जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव स्टारर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. फुलेरा गावात पुन्हा एकदा पंचायत होणार आहे. अलीकडेच 'पंचायत 3' च्या रिलीज डेटबरोबरच त्याच्या स्टारकास्टची पहिली झलकही समोर आली आहे. 'पंचायत'चं दोन सीझन हिट झाल्यानंतर आता तिसऱ्या सीझनची लोकांमध्ये जोरदार चर्चा आहे. फुलेरा गावची पलटन पुन्हा एकदा नवीन आव्हाने आणि संघर्षांसह एक रंजक कहाणीनं भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. आता अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्यांनीही या सीरीजचा ट्रेलर कधी येणार हे जाहीर केलं आहे.

'पंचायत 3'चा ट्रेलर कधी येणार? : 'पंचायत' वेब सीरीजची निर्मिती टीवीएफ प्रोडक्शन हाऊसनं केली आहे. आता 'पंचायत 3'चं नवीन पोस्टर त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "पंचायत 3' चा ट्रेलर 17 मे रोजी रिलीज होणार आहे. वेब सीरीजच्या नवीन पोस्टरबद्दल बोलायचं झालं तर एका बाजूला जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैजल मलिक, चंदन रॉय आणि सान्विका हातात लाठ्या घेतलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दुर्गेश कुमार, सुनीता राजवार, पंकज झा आहेत. याचाच अर्थ यावेळी फुलेरा गावात मोठा गदारोळ होईल.

'पंचायत 3' हा धमाका करेल : 9 डिसेंबर 2023 रोजी 'पंचायत 3' चा फर्स्ट लुक रिलीज झाला. यामध्ये जितेंद्र कुमार उर्फ अभिषेक त्रिपाठी हा त्याच्या दुचाकीवर दिसत होता. दुसऱ्या फोटोत अशोक पाठक (बिनोद) त्याचे दुर्गेश कुमार आणि बुल्लू कुमार यांच्याबरोबर दिसत होते. 'पंचायत 3' ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंतीची हिंदी वेब सीरीज आहे. जितेंद्र कुमार 'पंचायत 3' मध्ये सचिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. नीना गुप्ता पुन्हा एकदा सरपंचच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय नीनाच्या पतीच्या भूमिकेत रघुबीर यादव आहे. 'पंचायत 3' 28 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 'पंचायत 3' वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल. या सीरीजचा पहिला सीझन 3 एप्रिल 2020 रोजी रिलीज झाला. यानंतर 18 मे 2022 रोजी दुसरा सीझन आला होता. दोन्ही सीझन खूप हिट ठरले.

हेही वाचा :

  1. क्रिती सेनॉननं भावी जोडीदारीबद्दल केला खुलासा - KRITI SANON
  2. दीपक तिजोरी दिग्दर्शित टिप्प्सी चित्रपटाच्या प्रीमियरला सेलेब्रिटींची मांदियाळी - Deepak Tijori
  3. फरहान अख्तर हृतिक-सबासह पत्नीबरोबर डिनर डेटवर दिसला, चाहत्यांना झाली 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'ची आठवण - Farhan Akhtar with wife Shibani

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.