मुंबई - अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित 'जिगरा' चित्रपट आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल झाल्यानंतर चर्चेत आला आहे. भट्ट आणि करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनने सहनिर्मित केलेल्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये आलिया एका बहिणीच्या अनोख्या भूमिकेत झळकली आहे. अभिनेता वेदांग रैनानं तिच्या भावाची व्यक्तिरेखा साकारली असून यामध्ये ती भावाला परदेशातील तुरुंगातून सोडवत
Now Time to #JigraReview, Just Watched #Jigra
— College Student (@BollywoodBell) October 11, 2024
It's a MASTERPIECE.. ⭐⭐⭐⭐1/2
JIGRA is one of the best movie I have ever seen. And yes, I have seen many (including all IMDb 250 movies). It is a personal opinion and I connected with the film. The performances are amazing. Alia…
शोभिता धुलिपाला यांचीही भूमिका असलेला हा चित्रपट भरपूर ड्रामा आणि थरार असलेला मनोरंजक चित्रपट आहे. 'जिगरा' रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी पहिला शो पाहणाऱ्या अनेक चाहत्यांनी चित्रपटाबद्दलची आपली मतं एक्सवर नोंदवली आहेत. अनेक समीक्षकांनी आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नमुना असल्याचं एकानं म्हटलंय. यामध्ये असलेली भावनाप्रधानता आणि आकर्षक कथानक खिळवून ठेवणारं असल्याचंही यात म्हटलंय. चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं आणि सिनेमॅटोग्राफीचंही अनेकांनी कौतुक केलंय.
#Exclusive #JigraReview : This one is brutally emotional and hits hard!🔥🔥 #AliaBhatt is nothing short of flawless—she delivers a gut-wrenching performance that pulls you into her world from the very first scene.
— Vivek Mishra🔄 (@actor_vivekm) October 11, 2024
The film takes you on an intense emotional rollercoaster, with… pic.twitter.com/tetM2pDWtV
#JigraReview #AliaBhatt 🔥 🔥 🔥
— Vivek Mishra🔄 (@actor_vivekm) October 11, 2024
What a performance 👏 🙌 #Jigra #VedangRaina pic.twitter.com/yVhGUszbBq
"हा एक मास्टरपीस आहे. 'जिगरा' हा मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक", असल्याचं सांगत एका युजरनं पाचपैकी साडेचार स्टार दिले आहेत. दुसऱ्या एकानं हा चित्रपट भावनिक असून जोरदार हिट असल्याचं म्हटलंय. "या चित्रपटातील आलिया भट्टची व्यक्तिरेखा अगदी पहिल्या दृष्यापासून खिळवून ठेवते", असं म्हणत एका युजरनं आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलंय.
#Exclusive ....
— Always Bollywood (@AlwaysBollywood) October 3, 2024
Just finished watching #Jigra (Censor Copy)... This one is brutally emotional...🔥🔥... #AliaBhatt is just flawless....
Full #JigraReview soon..
Movie run time: 155 mins... pic.twitter.com/vod95ZTaUW
आणखी एक सकारात्मक रिव्ह्यू एका युजरनं देताना म्हटलंय की, "युनिक स्टोरीटेलिंगसह 'जिगरा' एक नवं कथानक तुमच्यासमोर उलगडतो. आधुनिक समस्यांसह पारंपारिक थीम्सचं यात उत्तम मिश्रण पाहायला मिळतं." आलिया भट्टच्या आणखी एका चाहत्याने तिच्या अभिनय कौशल्यावर लक्ष वेधताना तिच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलंय.
#JigraReview: Movie line is Good
— MJ Cartels (@Mjcartels) October 11, 2024
- #AliaBhatt connects with the story well, Her desperation to save her brother is executed well
- #VedangRaina did well,
Jail breaking & Some emotions scenes worked
- Story is flat mostly, lenghty scenes, Unwanted screenplay #JIGRA #Bollywood pic.twitter.com/seTv2B1CMx
असं असलं तरी काही प्रेक्षकांनी थोडं वेगळं लिहिलं आहे. हा एक सरासरी चित्रपट असल्याचं एकानं म्हटलंय आणि चित्रपटाची गती आणि लांबी यावर टीका केली आहे. "आलिया जेव्हा भावाला वाचवण्यासाठी धडपडत असताना कथानक सपाट वाटलं. हा 2 तास 33 मिनीटांचा छळ आहे. आलियाचा अभिनय सुमार दर्जाचा आहे.," असं त्यानं लिहिलंय.
#JigraReview : ⭐️⭐️
— Tejas (@Tejas01679537) October 10, 2024
Average.
The story is all about #AliaBhatt saving her brother #VedangRaina who has been arrested under false charges and in end Alia saves him This is the complete torture for
2h 33m. Alia acting is not up to the mark. Vedang is good. Good for ott. #Jigra. pic.twitter.com/UCEcG0thLt
Neetu Kapoor Via her instagram @aliaa08 #Jigra #AliaBhatt pic.twitter.com/nuEC3Fusup
— VulneraryEdits (@KrishnaOkr3708) October 10, 2024
संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी आलियाची सासू, नीतू कपूर यांनी चित्रपटाचं जाहीरपणे कौतुक केलंय. तिन आपल्या सूनेच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. 'जिगरा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावच्या विकी विद्या का वो वाला व्हिडिओ आणि रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्या वेट्टयान या चित्रपटांचा सामना करावा लागत आहे. याचा जिगराच्या यशावर नेमका काय परिणाम होतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे.