ETV Bharat / entertainment

आमिर खानची मुलगी आयरा खान झाली ट्रोल ; व्हिडिओ व्हायरल - व्हिडिओ व्हायरल

Ira khan spotted in Bandra : आमिर खानची मुलगी आयरा खानचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या मित्राच्या घराबाहेर दिसत आहे. यावर व्हडिओवर काहीजण टीका आणि ट्रोल करत आहेत.

Ira khan spotted in Bandra
आयरा खान वांद्रामध्ये दिसली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 11:28 AM IST

Updated : Feb 6, 2024, 11:36 AM IST

मुंबई - Ira khan spotted in Bandra : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती वांद्रा येथे मित्राच्या घराबाहेर दिसत आहे. आयरा खान चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते.

आयरा खानचा व्हिडिओ व्हायरल : शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आयरा ही शॉर्ट स्कर्ट आणि ग्रे टी-शर्टमध्ये दिसत आहे. तिनं कोल्हापुरी चप्पल घातलेली आहे. आयराचा हा लूक अनेकांना खूप आवडला आहे, तर काहीजण तिला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसत आहेत. तिच्या व्हिडिओवर एका व्यक्तीनं कमेंट करत लिहिलं की, ''जर बॉडी इतकी मोटी होत असेल तर जिम ट्रेनरशी लग्न करून काय फायदा.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''आयरा ही इतकी विचित्र का राहते.'' आणखी एकानं लिहिलं, ''ही मुलगी कमी आणि मुलगा जास्त वाटते.'' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. काहीजण या व्हिडिओवर आयराबद्दल चांगली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न : आयरा खाननं 3 जानेवारीला मुंबईत बॉयफ्रेंड नुपूरबरोबर नोंदणीकृत विवाह केला आणि त्यानंतर या जोडप्यानं 10 जानेवारीला उदयपूरमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केलंय. उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा कार्यक्रम खूप दिवस चालला. यानंतर 13 जानेवारीला आमिर खाननं चित्रपटसृष्टीतील स्टार्ससाठी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले, ज्यामध्ये साऊथचे स्टार्सही उपस्थित होते. लग्नानंतर हे जोडपे हनिमूनला इंडोनेशियामधील बाली येथे गेले होते. या जोडप्यानं तिथून त्यांचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा :

  1. रजनीकांत स्टारर 'लाल सलाम'चा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ
  2. वयाच्या 13व्या वर्षी वडील गमावले, केवळ 25 रुपये होती पहिली कमाई! अशा घडल्या 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर
  3. अ‍ॅनिमल दिग्दर्शकाने मला कास्ट केलं तर त्याचा माचो हिरो स्त्रीवादी होईल, कंगना रणौतची प्रतिक्रिया

Last Updated : Feb 6, 2024, 11:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.