ETV Bharat / entertainment

आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीनं मैदानातून अनुष्का शर्मासह मुलांना केला व्हिडिओ कॉल - virat kohli video viral - VIRAT KOHLI VIDEO VIRAL

Virat kohli And Anushka sharma : विराट कोहलीनं पंजाब किंग्सविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का शर्मा आणि आपल्या मुलांना व्हिडिओ कॉल केला. आता त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो त्यांच्याशी बोलताना दिसत आहे.

Virat kohli And Anushka sharma
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 12:06 PM IST

मुंबई - Virat kohli And Anushka sharma : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे जोडपे सध्या पालक झाल्यामुळे चर्चेत आहे. अनुष्का अनेकदा विराटला चिअरअप करण्यासाठी त्याचे क्रिकेट सामने पाहायला जात असते. मात्र, सध्या अनुष्का तिच्या बाळाची काळजी घेण्यात व्यग्र आहे. काल 25 मार्च रोजी विराट कोहलीनं शानदार खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. आता या विजयापेक्षा विराट वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या पत्नीबरोबर फोनवर बोलताना दिसत आहे.

सामना जिंकल्यानंतर विराट अनुष्काबरोबर बोलला : सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीनं मैदानातून व्हिडीओ कॉलवर पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांच्याशी संवाद साधला. विराटच्या संभाषणाची झलक कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या संभाषणादरम्यान तो अतिशय क्यूट पद्धतीनं बोलताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप आकर्षक होते. या व्हिडिओमध्ये तो पत्नी आणि आपल्या मुलांशी बोलताना, हसताना दिसत आहे. आता विराटच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचा हा व्हिडिओ युजर्सला खूप आवडला आहे.

विराटचा व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओवर एका यूरजनं लिहिलं, ''त्याचे क्यूट एक्सप्रेशन बघा''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''विराट कोहली सामन्यानंतर अनुष्का शर्माबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलतो किती सुंदर.'' आणखी एकानं लिहिलं, ''मला विराट आणि अनुष्काची जोडी खूप आवडते.'' याशिवाय काहीजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. दरम्यान सोमवारी पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं शानदार कामगिरी केली. विराटनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाला चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध सहज विजय मिळवून दिला. त्यानं 49 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची शानदार खेळी केली.

हेही वाचा :

  1. जान्हवी कपूरनं 'देवरा पार्ट 1'च्या गोव्यातील शुटिंग सेटवरून केला फोटो शेअर - Janhvi kapoor
  2. करीना कपूरने टांझानियातून शेअर केले पती सैफ अली बरोबरचे रोमँटिक फोटो - Kareena with Saif Ali
  3. होळीच्या नावाखाली श्वानांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे भडकली श्रद्धा कपूर, केला व्हिडिओ शेअर - shraddha kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.