मुंबई - International family day 2024 : दरवर्षी 15 मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेनं 15 मे 1994 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता. भारतात कौटुंबिक मूल्यांचं खूप महत्व आहे. हीच गोष्ट आपल्या चित्रपटसृष्टीतही दिसून येते. 'कभी खुशी कभी गम' , 'हम साथ साथ है', 'विवाह' असे अनेक चित्रपट आहेत, जे कुटुंबवर बनले आहेत. आज आपण अशाच काही चित्रपटांबद्दल बोलणार आहोत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'कभी खुशी कभी गम' (2001) :'कभी खुशी कभी गम' हा फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. हा परदेशात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, काजल, करीना कपूर यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन निर्माता करण जोहरनं केलं होतं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'हम साथ साथ हैं' (1999) : सूरज बडजात्या दिग्दर्शित 'हम साथ साथ है' हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये सलमान खान आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला रामलक्ष्मण यांनी संगीत दिलं होतं. अंबर एंटरटेनमेंट, राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली अजित कुमार बडजात्या, कमलकुमार बडजात्या, राजकुमार बडजात्या यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'विवाह' (2006) : शाहिद कपूर आणि अमृता राव स्टारर 'विवाह' हा कौटुंबिक ड्रामा आजही लोकांना आवडतो. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 539 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात एक सुंदर प्रेमकहाणी दाखवली गेली आहे.
'मैंने प्यार किया' (1989) : हा भारतातील 1989 चा सर्वात मोठा हिट चित्रपट होता. हा चित्रपट 80च्या दशकातील सर्वात यशस्वी बॉलीवूड चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपट भाग्यश्री आणि सलमान खान मुख्य भूमिकेत दिसले होते. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं 28 कोटींचा व्यवसाय केला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'हम आपके है कौन?' (1994) : सूरज बडजात्या दिग्दर्शित 'हम आपके है कौन?'मध्ये एक सुंदर प्रेमकहाणी पाहायला मिळाली. या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री ही लोकांना खूप आवडली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
हेही वाचा :
कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन'मधील भन्नाट पोस्टर केलं रिलीज - Kartik aaryan