मुंबई - Indrani Mukherjee : न्यायालयातील शीना बोरा हत्येप्रकरणीचा इंद्राणी मुखर्जी खटला अद्याप संपलेला नाही. अशातच 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ' हा माहितीपट नेटफ्लिक्सवर 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता या माहितीपटाचं प्रदर्शन थांबलं आहे. याआधी या माहितीपटाला सीबीआयनं यापूर्वीच विरोध केला आहे. विशेष अधिकारी, उच्च न्यायालय आणि संबंधित वकील हा माहितीपट पाहणार आहेत. त्याचा निकालावर काही परिणाम होईल की नाही, हे ठरविणार आहेत. याच खटल्यावर खंडपीठ 29 फेब्रुवारी रोजी पुन्हा सुनावणी करणार आहे.
'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ' प्रसारण थांबले : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं इंद्राणीच्या माहिपटावर निकाल दिलेला आहे. शीना बोराच्या हत्येची आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्यावरील माहितीपटच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळावी, यासाठी सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. इंद्राणी मुखर्जी ही शीना बोरा खून खटल्यात आरोपी आहे. या खटल्याचा अद्याप निकाल लागलेला नाही. म्हणून सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत माहितीपटाला विरोध केला.
नेटफ्लिक्सला बसला दणका : आता सीबीआयचे अधिकारी, उच्च न्यायालय आणि संबंधित वकिलांना स्क्रीनिंग दाखवल्याशिवाय हा माहितीपट प्रसारित केला जाणार नाही. त्यामुळेच नेटफ्लिक्सला हा जोरदार दणका बसलेला आहे. शीना बोरा हे हत्याकांड खूप गाजलं होतं. याबद्दल अनेक थेअरी कोर्टामध्ये मांडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती.
शीना बोरा हत्याकांड : शीना बोरा ही 24 वर्षांची असताना तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि कारचालक श्यामवर राय यांच्यावर खुना संदर्भात आरोप करण्यात आले होते. हा खटला मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयामध्ये सुरू आहे. याबाबत इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मिळालेला आहे. सध्या इंद्राणी जामिनावर बाहेर आहे.
हेही वाचा :