मुंबई - Indian 3 Trailer : साऊथ सुपरस्टार कमल हासन त्याच्या आगामी 'इंडियन 2' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवणार आहे. 'इंडियन 2' उद्या म्हणजेच 12 जुलै रोजी जगभरात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 28 वर्षांनंतर 'इंडियन'चा सीक्वेल 'इंडियन 2' आला आहे. कमल हासनच्या चाहत्यांना 'इंडियन 2'साठी बरीच काळ वाट पाहावी लागली. 'इंडियन 2'ची ॲडव्हान्स बुकिंग सुरू असून नुकतीच, या चित्रपटासाठी एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत 'इंडियन 2'चे दिग्दर्शक एस. शंकरनं कमल हासनच्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. यानंतर आता अनेक चाहते खूश झाले आहेत.
उद्या चित्रपट होईल प्रदर्शित : 'इंडियन 2'च्या दिग्दर्शकानं खुलासा करत सांगितलं की, "इंडियन 2' चित्रपटाच्या शेवटी 'इंडियन 3'चा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. हे सरप्राईज अपडेट देताना एस. शंकर यांनी सांगितलं आहे की, "जर 'इंडियन 3'चे पोस्ट प्रोडक्शनचं काम वेळेवर पूर्ण झालं तर येत्या सहा महिन्यांत चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल." 'इंडियन 2' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करेल असं अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. मुंबईत चित्रपटाचं प्रमोशन केल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर, कमल हासन आणि सिद्धार्थ केरळमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते.
— Mohammed Ihsan (@ihsan1043) July 10, 2024
'इंडियन 2'ची स्टार कास्ट : जेव्हा दिग्दर्शक शंकर यांना 'इंडियन 3'च्या रिलीजबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, "येत्या 'इंडियन 3' हा 6 महिन्यांत तुमच्या सर्वांसमोर येऊ शकतो, जर सर्व काही ठीक झालं आणि व्हिएफएक्सचे काम पूर्ण झालं तर, मी तुम्हाला नक्की याबद्दल अपडेट देईल. 'इंडियन 3'चा ट्रेलर 'इंडियन 2' च्या शेवटी रिलीज होणार आहे." 'इंडियन 2' च्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं यात कमल हासन व्यतिरिक्त सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंग, एसजे सूर्या, बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रेड जायंट मुव्हीज आणि लायका प्रॉडक्शननं चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिलंय.
हेही वाचा :
- कमल हासन स्टारर 'इंडियन 2'चा प्री रिलीज इव्हेंट होणार 'या' दिवशी - indian 2 pre release event
- 'इंडियन 2' मधून परतलेल्या सेनापतीचं नेटिझन्सकडून जोरदार स्वागत, ट्रेलरनं देशभर निर्माण केली हवा - Indian 2 Trailer
- कमल हासन अभिनीत 'इंडियन 2'च्या ट्रेलरचं काउंटडाऊन सुरू - Indian 2 Trailer