मुंबई - IND vs PAK Match : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना झाला. पाकिस्ताननं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारतीय संघाला 19 ओव्हरमध्ये बाद केलं. भारतानं पाकिस्तानला 120 धावांचे लक्ष्य दिलं होतं. चांगली सुरुवात करूनही पाकिस्तानला भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय संघानं पाकिस्तान संघाला 6 धावांनी पराभूत केलं. टी-20 विश्वचषकस्पर्धेत पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानमधील लोक नाराज झाल्याचं यावेळी दिसलं. आता भारतीय संघ जिंकल्याचा जल्लोष साजरा होताना दिसत आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपला आनंद व्यक्त करत आहेत.
भारताच्या विजयावर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया : सामना संपताच विराट कोहलीची पत्नी-बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं आनंदानं उडी घेतली आणि उत्साहात आपल्या मुठी आवळल्या. यावेळी अनुष्का ही कॅज्युअल लूकमध्ये होती. अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुसरीकडे रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारताच्या विजयानंतर, रितिका ही उभी राहून भारतीय संघाचं अभिनंदन करताना दिसत आहे. तिनं आपल्या मुलीबरोबर मॅचचा आनंद घेतला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना : भारतानं 19 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या.आघाडीच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ऋषभ पंतच्या फलंदाजीनं संघाला साथ दिली. त्यानं 31 चेंडूत 42 धावा केल्या. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा सातव्यांदा भारताकडून पराभव झाला आहे. पाकिस्तानचा स्कोर 113/7 होता. आता पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर ती शेवटी 'कनेडा' या चित्रपटामध्ये दिसली होती. आता पुढं ती 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटामध्ये झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट स्पोर्टवर आधारित आहे. सध्या या चित्रपटाबद्दल शूटिंबाबत कुठलेली माहिती समोर आलेली नाही.'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाचं दिग्दर्शन प्रोसित रॉय करत आहे.
हेही वाचा :
- नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या कोण काय म्हणाले... - Narendra Modi PM Oath
- सोनाक्षी सिन्हाचं झहीर इक्बालबरोबर लग्न होईल?, सोशल मीडियावर चर्चेला उधाण - SONAKSHI SINHA
- बॉलिवूडनं साजरा केला भारतचा पाकिस्तान विरुद्धचा विजय, वाचा काय म्हणताहेत सेलेब्रिटी - IND VS PAK