ETV Bharat / entertainment

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर दिसणार करण जोहरच्या 'नादानियां' चित्रपटात - इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर

Ibrahim ali khan and Khushi kapoor : अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर करण जोहरच्या 'नादानियां' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल.

Ibrahim ali khan and Khushi kapoor
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 5:37 PM IST

मुंबई - Ibrahim ali khan and Khushi kapoor : सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तो करण जोहरच्या चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये खुशी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. आता या चित्रपटाचे शीर्षक समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे नाव 'नादानियां' आहे. करण जोहर त्याच्या आगामी चित्रपटातून इब्राहिमला हिरोच्या रुपात लॉन्च करत आहे. 'नादानियां' हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला जात आहे. सध्या इब्राहिम अली खान दिग्दर्शनाचे कौशल्य शिकत आहेत.

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर दिसणार एकत्र : इब्राहिम करण जोहरबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. त्यानं करणला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात असिस्ट केलं होतं. दुसरीकडे खुशी कपूरनं झोया अख्तरच्या 'द आर्चिज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. खुशीच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटामध्ये सुहाना खान आणि अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा यांच्यासह अनेक स्टार किड्सनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. दरम्यान इब्राहिम आणि खुशीचा 'नादानियां' चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी असेल असे सांगण्यात येत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार? : इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर अभिनीत हा चित्रपट थिएटरऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होईल. शौना गौतम या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे, त्याचा हा डेब्यू चित्रपट असेल. इब्राहिम अली खान आणि शौना गौतम यांनी करण जोहरला त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या सेटवर असिस्ट केलं होतं. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट अभिनीत हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, ज्यानं बॉक्स ऑफिसवर 350 कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट अनेकांना आवडला होता.

करण जोहरनेही 'या' स्टारकिड्स लॉन्च केले आहेत : करणनं यापूर्वी खुशीची बहीण जान्हवी कपूरला 'धडक' चित्रपटातून लॉन्च केलं होतं. जान्हवीच्या आधी करण जोहरनं सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि वरुण धवनला अभिनय क्षेत्रात लॉन्च केलं होतं. तो संजय कपूरची मुलगी शनाया देखील एका चित्रपटांमधून लॉन्च करत आहे. इब्राहिमप्रमाणेच वरुण आणि सिद्धार्थनं करणच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंग 'शक्तिमान' चित्रपटात दिसणार सुपरहिरोच्या भूमिकेत
  2. 'महाभारत' फेम 'कृष्ण' नितीश भारद्वाज यांनी आयएएस पत्नीवर केले गंभीर आरोप
  3. 'पोचर'चा अधिकृत ट्रेलर रिलीज, सर्वात मोठ्या गुन्हेगारी रॅकेटचा 23 तारखेला होणार पर्दापाश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.