ETV Bharat / entertainment

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' ओटीटीवर प्रदर्शित - Fighter OTT Release - FIGHTER OTT RELEASE

Fighter OTT Release : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'फायटर' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे.

Fighter OTT Release
फायटर ओटीटी रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 2:35 PM IST

मुंबई -Fighter OTT Release : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. 'फायटर' चित्रपट 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर चांगली कामगिरी केली होती. याशिवाय समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं आहे. आता ज्या प्रेक्षकांनी 'फायटर' चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. हा चित्रपट 21 मार्च रोजी रात्री 12 वाजता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. स्ट्रीमिंग व्हर्जनमध्ये थिएटरच्या रिलीजमधून काढलेले सीन देखील दाखवले जाणार आहे.

नेटफ्लिक्सनं शेअर केली पोस्ट : नेटफ्लिक्स इंडियाच्या इंस्टाग्राम हँडलवर 20 मार्च रोजी म्हणजेच बुधवारी या चित्रपटामधील एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ''लेडीज अँड जेंटलमेन, फायटर लँडिंगसाठी तयार आहे, 'फायटर' आज रात्री 12 वाजता नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण व्यतिरिक्त अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अझीझ , संजीदा शेख, आशुतोष राणा आणि इतर कलाकार दिसले आहेत. 'बँग बँग' आणि 'वॉर' नंतर हृतिक रोशनचा आणि सिद्धार्थ आनंद यांच्याबरोबरचा तिसरा एकत्रित चित्रपट आहे.

ओटीटी स्ट्रीमिंगवर हृतिक रोशननं शेअर केली पोस्ट : हृतिक रोशननं या चित्रपटाबद्दल म्हटलं होतं, ''फायटर हा चित्रपट भारतीय वायुसेनेला आमची सलामी आहे आणि नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत असताना, मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना 'फायटर' आवडेल.'' 'फायटर' हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते सिद्धार्थ आनंद व्यतिरिक्त रमोन चिब, अजित अंधरे, अंकू पांडे, केविन व्हाझ, ममता भाटिया हे आहेत. दरम्यान, हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो रणबीर कपूर बरोबर 'रामायण'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'वॉर 2' आणि 'क्रिश 4'मध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. Allu Arjun : अल्लू अर्जुननं इन्स्टाग्रामवर 25 दशलक्ष फॉलोअर्स झाल्यानंतर मानले चाहत्यांचे आभार - Allu Arjun
  2. Stri and Singham sequel : 'स्त्री'चा दुसरा आणि 'सिंघम'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला! - Stri and Singham sequel
  3. Baaghi 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'बागी' फ्रेंचाइजीचा चौथा भाग येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.