ETV Bharat / entertainment

'पायरट्स ऑफ द कॅरिबियन' अभिनेता तामायो पेरीचा शार्क हल्ल्यात धक्कादायक मृत्यू - TAMAYO PERRY DIES

Tamayo Perry Dies : 'पायरट्स ऑफ द कॅरिबियन' फेम तामायो पेरीचा रविवारी हवाईमध्ये मृत्यू झाला. त्याच्यावर शार्कनं हल्ला केला होता.

Tamayo Perry Dies
तामायो पेरीचा मृत्यू (Tamayo Perry - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 2:38 PM IST

मुंबई - Tamayo Perry Dies : 'पायरट्स ऑफ द कॅरिबियन' स्टार तामायो पेरीचा रविवारी हवाईमध्ये मृत्यू झाला. तो ओआहू बेटावर सर्फिंग करत असताना त्याच्यावर गोटआयलँडजवळ एका शार्कनं हल्ला केला. हा हल्ला इतका जोरदार होता की त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याचं वय 49 वर्षांचे होतं. 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन: ऑन स्ट्रेंजर टाइड्स'मध्ये त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली होती. जेव्हा तामायो पेरीवर शार्कनं हल्ला झाला, तेव्हा एका जवळच्या व्यक्तीनं आपत्कालीन सेवांना संपर्क केला होता. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्याला जेट स्कीवर किनाऱ्यावर आणले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला समुद्रकिनाऱ्यावर मृत घोषित केलं.

शार्कच्या चाव्यामुळे झाली गंभीर जखम : तामायो पेरीच्या मृत्यूनंतर, तेथे शार्क असल्याचं सांगण्यात आलं. अहवालानुसार तामायोच्या शरीरावर शार्क चावल्यामुळे गंभीर जखमा झाल्या होत्या. जुलै 2016 मध्ये त्यानं जीवरक्षक म्हणून महासागर सुरक्षा विभागाबरोबर काम करण्याची सुरुवात केली होती. तामायो पेरी हा एक सर्फिंग प्रशिक्षक देखील होता. वर्ल्ड सर्फ लीगनं त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. तसेच सर्फ समुदायानं रविवारी पोस्ट करून लिहिलं होतं, "एक प्रिय अभिनेता गमावला हे सांगताना आम्हाला खूप दुःख होत आहे. तामायो पेरी, एक प्रसिद्ध सर्फर आणि लाइफगार्ड, ओआहूच्या पूर्वेकडील शार्क हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मरण पावला."

चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली : तामायो हा डब्लूएसएलचा सदस्य असून तो नॉर्थ शोर समुदायचा एक भाग होता. त्याच्या अशा अचानक निधनामुळे त्याचे चाहते खूप दुखी झाले आहेत. याशिवाय आता हॉलिवूडमधील काही कलाकर पोस्ट शेअर करून तामायो पेरीला श्रद्धांजली वाहत आहेत. या शहराच्या महापौरांनी देखील त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. आता त्याचा मृत्यूनंतर अधिकाऱ्यांनी परिसरात शार्कपासून सावध राहण्याच्या सूचना लोकांना दिल्या आहेत. आता या परिसरातील लोक या हल्ल्यामुळे घाबरून गेले आहेत.

हेही वाचा :

  1. 5 महिन्यांत जिममध्ये घाम गाळून 26 किलोपेक्षा कमी वजन केल्यानंतर जयदीप अहलावत केलं चाहत्यांना प्रभावित - JAIDEEP AHLAWAT
  2. खाऊ गल्लीत नीता अंबानींनी चाट समोस्यावर मारला ताव, चाटवाल्याला दिलं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण - NITA AMBANI EAT VARANASI CHAAT
  3. अभिनेता जितेंद्रच्या ड्रेस डिझाईनरचा चोरीला गेलेला मोबाईल सापडेल का? - A stolen mobile phone

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.