ETV Bharat / entertainment

हिना खान गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप 10मध्ये सामील, पोस्ट शेअर करून केल्या भावना व्यक्त... - TOP SEARCHED ACTORS OF 2024

टीव्ही अभिनेत्री हिना खान गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप 10 स्टार्समध्ये सामील झाली आहे. आता यावर हिनानं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Hina Khan
हिना खान (हिना खान (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 13, 2024, 4:20 PM IST

मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीबाबत चर्चेत आहे. नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे, यामध्ये तिच्या तब्येतीच्या कारणास्तव, 2024 मध्ये गुगलवर हिना खानला अनेक लोकांनी सर्च केलं होतं. जगातील टॉप 10 सर्वाधिक सर्च केलेल्या अभिनेत्यांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. आता यावर हिनाची प्रतिक्रिया आली आहे. गुरुवारी हिना खाननं इंस्टाग्राम स्टोरीवर कृतज्ञता व्यक्त करत तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मी पाहिलं की, अनेक लोक स्टोरी लिहून नवीन घडामोडीबद्दल माझे अभिनंदन करत आहेत. मात्र खर सांगायचं झालं तर ही माझ्यासाठी कोणतीही उपलब्धी नाही आणि यात काही अभिमानाची गोष्ट नाही.'

हिना खानची पोस्ट व्हायरल : यानंतर तिनं पुढं लिहिलं, 'इंटरनेटवर कोणालाही त्यांच्या आजारपणामुळे आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे गुगलवर सर्च करावे लागू नये, अशी माझी इच्छा आणि प्रार्थना आहे.' या कठीण काळात माझ्या प्रवासाबद्दल लोकांच्या आदराचे मी नेहमीच कौतुक केले आहे. माझ्या कामाबद्दल आणि कामगिरीबद्दल मला ओळखलं जावं असे मला वाटते. जसे डाइग्नोसिस पूर्वीच्या दरम्यान माझ्याबद्दल होते.' आता हिनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हिना खाननं व्यक्त केल्या भावना : याशिवाय हिनानं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं केमोथेरपीनंतर रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, हिना हॉस्पिटलचा ड्रेसमध्ये दिसत असून ती दरवाजाकडे जात आहे. ठिक तिच्या पाठीमागे कॅमेरा आहे. फोटोबरोबर तिनं लिहिलं की, 'या कॉरिडॉरमधून मी माझ्या आयुष्याच्या प्रकाशाकडे जात आहे. कृतज्ञता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत हिना खान एका हातात प्लेटलेट आणि रक्ताची पिशवी घेऊन जाताना दिसत आहे. दुसऱ्या हातात तिनं युरीनची पिशवी धरली आहे. आता तिच्या पोस्टवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देऊन तिला थीर देत आहेत.

हेही वाचा :

  1. कॅन्सरग्रस्त हिना खानची 'बिग बॉस 18'मध्ये एन्ट्री, सलमानच्या दिलास्यानंतर रडली अभिनेत्री
  2. कॅन्सरग्रस्त हिना खाननं 'करंट सोर्स ऑफ मोटिव्हेशन'चा केला खुलासा, पोस्ट झाली व्हायरल
  3. ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारादरम्यान हिना खाननं वर्कआउटचा व्हिडिओ केला शेअर - Hina Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.