ETV Bharat / entertainment

संजय लीला भन्साळी यांनी 'हिरामंडी द डायमंड बाजार'च्या सीझन दोनची केली घोषणा... - Heeramandi The Diamond Bazaar - HEERAMANDI THE DIAMOND BAZAAR

Heeramandi Season 2: 'हिरामंडी: द डायमंड बाजार'च्या जबरदस्त यशानंतर निर्मात्यांनी सीझन 2 जाहीर केला आहे. निर्मात्यांनी आज 3 जून रोजी एक व्हिडिओ शेअर केला आणि नवीन सीझनबद्दल माहिती दिली आहे.

Heeramandi Season 2
'हिरामंडी सीझन 2 ('हीरामंडी 2'ची टीम (ANI Photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 7:16 PM IST

मुंबई - Heeramandi Season 2 : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची डेब्यू 'हिरामंडी: द डायमंड बाजार' वेब सीरीज खूप हिट झाली आहे. आता अनेकजण दुसऱ्या सीझनची आतुरतेनं वाटत पाहात आहेत. दरम्यान 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर लॉन्च झाल्यापासून वेब सीरीजच्या शानदार कामगिरीनंतर एक घोषणा करण्यात आली आहे. एका मुलाखतीत भन्साळी यांनी 'हिरामंडी'च्या पुढील भागासाठी योजना केल्याचं उघड केलय. आज, 3 जून रोजी भन्साळी प्रॉडक्शन आणि नेटफ्लिक्स इंडियानं 'हिरामंडी सीझन 2'ची घोषणा केली आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

'हिरामंडी : सीझन 2' येईल लवकरच : व्हिडिओ शेअर करताना भन्साळी यांनी लिहिलं, "मेहफिल पुन्हा जमेल, 'हिरामंडी: सीझन 2' लवकरच येईल." व्हिडिओमध्ये मुंबईतील कार्टर रोडवर अनारकली आणि घुंगरू परिधान केलेल्या सुमारे 100 डान्सर्स दिसत आहेत. या नृत्यांगना 'हिरामंडी' वेब सीरीजमधील 'सकल बन' आणि 'तिलस्मी बहें' या मिक्स गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी पीरियड-ड्रामा वेब सीरीजच्या दुसऱ्या सीझनबद्दल खुलासा करत पुढं सांगितलं, "वेब सीरीज बनवताना खूप काही लागतं. या वेब सीरीजमध्ये बरेच काही गेले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये गंगूबाई रिलीज झाल्यापासून, मी प्रत्येक दिवस काम केलं आहे. या वेब सीरीजची जबाबदारी खूप मोठी आहे."

हिरामंडी: द डायमंड बाजार'ची स्टार कास्ट : सीझन 2ची पुष्टी करताना भन्साळी यांनी पुढं म्हटलं, "हिरामंडी 2'मध्ये महिला आता लाहोरहून फिल्मी दुनियेत आल्या आहेत. फाळणीनंतर त्या लाहोर सोडतात, त्यापैकी बहुतेक महिला मुंबई चित्रपट उद्योग आणि कोलकाता चित्रपट उद्योगात स्थायिक होतात. त्यामुळे त्यांचा बाजारातील प्रवास तसाच राहतो. त्यांना अजूनही नाचायचे आहे आणि गायचं आहे, मात्र यावेळी नवाबांसाठी नाही तर निर्मात्यांसाठी आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्या सीझनची योजना आखत आहोत, बघूया ते किती पुढे जाते." 'हिरामंडी' ही वेब सीरीज खूप गाजली. त्यामुळे आता दुसरा सीझन येणार आहे. 'हिरामंडी: द डायमंड बाजार' वेब सीरीज मध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, संजीदा शेख, रिचा चढ्ढा आणि शर्मीन सहगल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. सुशांत सिंहनं आत्महत्या केलेल्या घरात शिफ्ट झाली अदा शर्मा - Adah Sharma
  2. रवीना टंडन पार्किंग प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया, केली पोस्ट शेअर - Kangana Ranaut
  3. उर्फी जावेदच्या ओठ, डोळे आणि चेहऱ्यावर सूज, जाणून घ्या कारण - Uorfi Javed

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.