मुंबई : मिस युनिव्हर्सचा किताब 2021मध्ये जिंकणारी हरनाज कौर संधू बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. हरनाज टायगर श्रॉफ आणि संजय श्रॉफ स्टारर 'बागी 4' मधून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल ठेवणार आहे. 'बागी 4'च्या निर्मात्यांनी आज, 12 डिसेंबर रोजी याची पुष्टी केली आहे. गुरुवारी नाडियाडवाला ग्रैंडसननं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हरनाज कौर संधूचा फोटो पोस्ट केला आहे. आता 'बागी 4' टीममध्ये हरनाज सामील होणार आहे. नाडियाडवाला ग्रैंडसननं पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'मिस युनिव्हर्सपासून, तर बागी युनिव्हर्सपर्यंत. 'बागी 4'मधील आमची नवीन टॅलेंट, लेडी हरनाज संधूला सादर करत आहोत. 5 सप्टेंबर 2025 रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे.'
हरनाज संधू दिसणार 'बागी 4' चित्रपटात : हरनाज संधूनं यापूर्वीही अभिनय केला आहे. तिनं यापूर्वी पंजाबी भाषेतील 'बाई जी कुट्टंगी' (2022), आणि 'यारां दियां पौन बारां' (2023) या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. आता ती 'बागी 4'मध्ये रुपेरी पडद्यावर धमाका करताना दिसत आहे.
संजय दत्तचं पोस्टर : हरनाजच्या पूर्वी, निर्मात्यांनी संजय दत्तचे पोस्टर रिलीज केले होते आणि त्याच्या टीममध्ये सामील झाल्याची पुष्टी केली होती. 9 डिसेंबर रोजी निर्मात्यांनी सोशल मीडियावर संजय दत्तचे पोस्टर रिलीज करून पोस्टवर लिहिलं होत की, 'प्रत्येक प्रियकर खलनायक असतो'. पोस्टरमध्ये संजय दत्तच्या मांडीवर एक निर्जीव महिला असून तो सिंहासनावर बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदनांसोबतच सूडाची भावना स्पष्ट दिसत होती. संजय दत्तची ही भूमिका पाहणे खूप मनोरंजक असणार आहे. आता संजय दत्त आणि टायगरचे अनेक चाहते, त्याच्या या आगामी चित्रपटाची खूप आतुरतेनं वाट पाहात आहे.
- 'बागी 4'ची स्टारकास्ट : निर्मात्यांनी आत्तापर्यंत 'बागी 4' मधील चार मुख्य पात्रांचा खुलासा केला आहे. हरनाजबरोबर टायगर श्रॉफ, सोनम बाजवा आणि संजय दत्त स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
हेही वाचा :