ETV Bharat / entertainment

बिग बॉसमध्ये 'पुन्हा येईन', गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' गर्जना !! - GUNARATNA SADAVARTE BIG BOSS 18

Gunaratna Sadavarte : बिग बॉस 18 या हिंदी शोमधून गुणरत्न सदावर्ते बाहेर पडल्यानंतर अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. स्वतः गुणरत्नेंनी याबाबतचा खुलासा केला आहे.

Gunaratna Sadavarte
गुणरत्न सदावर्ते (Etv Bharat / PTI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 16, 2024, 5:54 PM IST

Updated : Oct 16, 2024, 6:02 PM IST

मुंबई - बिग बॉसच्या 18 व्या पर्वातून गुणरत्न सदावर्ते बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांना करमेना झालंय. आता बिग बॉस हाऊसमध्ये जे स्पर्धक आहेत त्यापेक्षा सदावर्ते असताना अधिक गंमत येत होती, असा सूर नेटिझन्समधून उमटताना दिसतोय. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात एक महत्त्वाची केस सध्या सदावर्ते लढत आहेत. यासाठीच त्यांना बिग बॉसमधून बाहेर पडावं लागल्याचं त्यांनी म्हटलंय.

सदावर्तेंची 'डंके की चोट पे' घोषणा

नुकतेच प्रसार माध्यमांशी बोलताना अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिलं. बिग बॉस इतकीच न्यायालयातील केसही महत्त्वाची असल्यामुळं आपण बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु आपल्यावर प्रेम करत असलेल्या प्रेक्षकांना आपण नाराज न करता त्यांच्यासाठी पुन्हा येईन म्हणताना सदावर्तेंचा आवाज वाढला. 'डंके की चोट पे' असं म्हणताना त्यांनी परत येणार असल्याची गर्जना यावेळी केली. यावेळी सदावर्ते यांनी पत्नी जयश्री पाटील यांना कॉलेजमध्ये कसं पटवलं याचा किस्साही सांगितला.

गुणरत्न सदावर्ते (Etv Bharat / PTI)

दाऊदला टाचंखाली ठेवतो तिथं दुसऱ्यांची काय बिशाद...!

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांपैकी कुणी जास्त त्रास दिला, असं विचारलं असता सदावर्ते म्हणाले, "माझ्या विरुद्ध जाणारा किंवा मला दाबायचा प्रयत्न करणारा अजून जन्माला यायचा आहे. आम्ही तर दाऊद इब्राहिम सारख्या दहशतवाद्याला टाचंखाली चिरडायला तयार असतो, त्यामुळं माझ्याशी कोणी पंगा घेऊ शकत नाही. 'क्योंकी हम जो भी बोलते है, डंके की चोट पे बोलते हैं, क्योकी हम डाकुओं के खानदान से है' ", असं म्हणत सदावर्तेंनी आपण निर्भय असल्याचं सांगितलं.

बॉलिवूडनं अंडरवर्ल्डपासून दूर राहावं

आपण ज्याला बॉलिवूड म्हणतो त्यातील कलाकारांनी अंडरवर्ल्डपासून अंतर राखून राहिलं पाहिजे. ''शाहरुख, सलमान, गोविंदा, कंगना असे सर्व कलाकार चांगले आहेत. परंतु, तिथं काही कलाकारांवर बाहेरील शक्तीही प्रभाव टाकत असतात, ते टाळलं पाहिजे. सध्या बिग बॉसमध्ये जे स्पर्धक आहेत त्यांनी आपल्या कॅरेक्टरमधून बाहेर पडून खेळलं पाहिजे'', अशा अनेक विषयावरील खुलासे अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहेत.

Last Updated : Oct 16, 2024, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.