ETV Bharat / entertainment

क्यूट 'गुलाबी' गँग 'या' दिवशी येईल प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या तारीख - Gulabi MOVIE - GULABI MOVIE

Gulabi Marathi Movie: अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे स्टारर 'गुलाबी' चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Gulabi Marathi Movie
गुलाबी मराठी चित्रपट (Instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 16, 2024, 12:30 PM IST

मुंबई - Gulabi Marathi Movie: मराठी कलाविश्वात ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची छाप सोडणाऱ्या अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या साथीला असणार आहे श्रुती मराठे ही आणखी एक गुणी अभिनेत्री. चित्रपटाचं नाव 'गुलाबी'! नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीनं तारीख जाहीर करण्यात आली आहे. व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'गुलाबी' हा चित्रपट येत्या 22 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे हे आहेत. 'गुलाबी' मध्ये अश्विनी, मृणाल, श्रुतीसह सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला साई पियुष यांनी संगीत दिलं आहे.

'गुलाबी' चित्रपटाची कहाणी : सोशल मीडियावर नुकत्याच पोस्ट झालेल्या व्हिडिओमध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवताना दिसतात. शेवटी भेटण्याची तारीख 22 नोव्हेंबर ठरते. याच दिवशी प्रेक्षकां 'गुलाबी' चित्रपटगृहात पाहता येईल. विचार, वागणूक, स्वप्नं आणि नाती या सर्वांची गोड 'गुलाबी' मांडणी या चित्रपटात दिसेल, असा चित्रपटाच्या निर्मात्यांचा दावा आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि शीर्षकावरुन हा चित्रपट तीन मैत्रिणींभोवती फिरणारा असेल. यात तिन्ही मैत्रिणींची पार्श्वभूमी मात्र वेगळी असणार आहे. यामुळे चित्रपटात काहीतरी वेगळी गोष्ट चित्रपटरसिकांना पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

स्त्रीप्रधान चित्रपट : 'गुलाबी' चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर याबाबत सांगितलं की, "आज गणपती बाप्पाच्या प्रसन्न वातावरणात 'गुलाबी' चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. 'गुलाबी' या नावावरून सिनेमा स्त्रीप्रधान असला, तरी त्यात मनोरंजनही तितकेच आढळून येईल. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतील. 'गुलाबी' ही केवळ एक कहाणी नाही, तर तो विचार, वागणूक, स्वप्न आणि नाती यांचा एक सुंदर 'गुलाबी' प्रवास आहे, जो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनुभवांशी जोडलेला आहे. या चित्रपटात आम्ही स्त्रीच्या भावविश्वाची, संघर्षाची आणि यशाची गाथा मांडली आहे. हा चित्रपट प्रत्येकाला स्वतःची ओळख आणि स्वप्नं पुन्हा नव्यानं जगायला प्रेरित करेल. प्रेक्षकांना त्यांच्याशी निगडित असलेल्या भावना या चित्रपटातून नक्कीच अनुभवता येतील." आता 'गुलाबी' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर अनेकजण खुश आहेत. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटासारखा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट होईल अशी अपेक्षा सध्या केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.