मुंबई Sunil Kumar as a Sarkata : बॉलिवूडचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री'चा सीक्वेल 'स्त्री 2' हा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. 'स्त्री 2'मध्ये राजकुमार, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या अभिनयानं रुपेरी पडद्यावर धमाल केली आहे. 'स्त्री 2' चित्रपटामध्ये वरुण धवन आणि अक्षय कुमार यांनी कॅमिओ केला आहे. हा कॅमियो खूप हिट ठरला आहे. 'स्त्री 2'मध्ये सरकटेची दहशत दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील सरकटेचा सीन पाहिल्यानंतर असं वाटतं की तो पूर्णपणे व्हीएफएक्सद्वारे तयार करण्यात आला असेल, मात्र असं काही नाही, सरकटेची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीची प्रत्यक्षात उंची ७ फुटांपेक्षा जास्त आहे. सरकटेला हिट बनवण्यासाठी एका व्यक्तीनं खूप मेहनत केली आहे.
'स्त्री 2'मधील सरकटेची भूमिका : 'स्त्री 2' या चित्रपटात सरकटेची उंची सामान्य माणसांपेक्षा खूप जास्त आहे. आता ही भूमिका करणाऱ्या व्यक्तीचं नाव सुनील कुमार असं आहे. हा जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे. सुनील एक पोलीस हवालदार असून 'स्त्री 2' चित्रपटातील त्याचं काम निर्मात्यांना तसंच प्रेक्षकांनाही आवडलं आहे. सुनील कुमारला जम्मू-काश्मीरचा ग्रेट खली देखील म्हटलं जातं. सुनील कुमारची उंची 7.7 फूट आहे, तसंच खलीची उंची 7.1 फूट आहे. सुनील कुमारलाही खलीप्रमाणे कुस्ती आवडते.
सुनील कुमारनं 'या' हिट चित्रपटात केलय काम : सुनीलला क्रीडा कोट्यातून पोलीस खात्यात नोकरी मिळाली आहे. याशिवाय तो 2019 मध्ये 'डब्लू डब्लू ई'मध्ये ट्रायआउटसाठीही गेला होता. सुनील हा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 13 हजार फॉलोअर्स आहेत. 'स्त्री 2'च्या निर्मात्यांना त्यांच्या कास्टिंग टीमकडून सुनीलबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर सुनीलची उंची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यची माहीती मिळवल्यानंतर त्याला सरकटेच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या म्हणण्यानुसार, सरकटे यांचा चेहरा सीजीआयच्या मदतीनं तयार करण्यात आला आहे. यामध्ये सुनीलच्या बॉडी शॉट्सचाही वापर करण्यात आला. याशिवाय सुनीलनं 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातही काम केलय.
हेही वाचा :