ETV Bharat / entertainment

थलपथी विजयच्या वाढदिवसानिमित्त G.O.A.T चा थरारक अ‍ॅक्शन टीझर लॉन्च - Thalapathy Vijay birthday - THALAPATHY VIJAY BIRTHDAY

Thalapathy Vijay birthday : थलपथी विजयच्या आगामी G.O.A.T या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्याच्या या चित्रपटातील अवताराकडं पाहून आश्चर्यचकित होत आहेत. विजयच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त 'गोट'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

G.O.A.T thrilling action teaser launch
G.O.A.T चा थरारक अ‍ॅक्शन टीझर लॉन्च ((IMAGE- ASG INSTAGRAM))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 11:55 AM IST

मुंबई - Thalapathy Vijay birthday : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय थलपथीआज 22 जून रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्यानं त्याच्या चाहत्यांना 'ग्रेट ऑफ ऑल टाईम' ( G.O.A.T ) या नवीन चित्रपटातून एक नवीन भेट दिली आहे. थलपथी विजयचा G.O.A.T हा चित्रपट या वर्षीच प्रदर्शित होणार असून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यानं अनोखा भेट दिली आहे. त्यानं चित्रपटाचा अ‍ॅक्शन आणि स्टंटफुल टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये थलपथी विजयची दुहेरी भूमिका दिसत आहे. त्यामुळे विजयच्या चाहत्यांचा आनंदही द्विगुणित झाला आहे.

G.O.A.T चा टीझर आश्चर्यचकित करणारा

या टीझरची सुरुवात अ‍ॅक्शनने होते आणि विजयच्या मागे काही बाईकस्वार आणि कार पाठलाग करत आहेत आणि अ‍ॅक्शनमध्ये विजय त्याच्याच तंद्रीत बाइक चालवत आहे. मात्र, टीझरचा शेवटचा सीन सर्वात आश्चर्यचकित करणारा आणि रोमांच वाढवणारा आहे. टीझरच्या शेवटी, विजय बाईकवर फिरतो आणि त्याची दुहेरी भूमिका चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का ठरते.

या चित्रपटाचं दुसरे गाणं आज रिलीज होणार

आज, 22 जून रोजी थलपथी विजयच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या या चित्रपटातील 'चिन्ना चिन्ना कंगल' हे गाणं संध्याकाळी 6 वाजता प्रदर्शित होणार आहे. G.O.A.T च्या निर्मात्यांनी काल 'चिन्ना-चिन्ना कंगल' या गाण्याचं पोस्टर शेअर करून ही माहिती दिली होती आणि एक पोस्टरही शेअर केलं होतं. या पोस्टरमध्ये विजय त्याच्या कुटुंबाबरोबर एका भूमिकेत दिसत होता. व्यंकट प्रभू यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -

कल्की 2898 एडीच्या ट्रेलरमध्ये दिसली 'अंतिम युद्धा'ची झलक, ट्रेलरला अभूतपूर्व प्रतिसाद - Kalki 2898 AD trailer

ईडीनं सील केलेल्या बंगल्यात सलमान खानचं वास्तव्य, आरटीआय अर्जामुळं महाबळेश्वरातून घेतला काढता पाय - Salman Khan leaves Mahabaleshwar

"मी खरं बोललो तर अभय देओल तोंड दाखवायला जागा राहणार नाही" : अनुराग कश्यप - ANURAG KASHYAP ON PANKAJ JHA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.