ETV Bharat / entertainment

गश्मीर महाजनी स्टारर 'फुलवंती' चित्रपट होणार 'या' दिवशी रिलीज, जाणून घ्या तारीख - Gashmeer Mahajani

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 3:12 PM IST

Fulvanti Movie : 'फुलवंती' चित्रपटात गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Fulvanti Movie
फुलवंती चित्रपट (Fulvanti Movie -Instagram)

मुंबई - Fulvanti Movie : छत्रपतींनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी सांभाळली होती. पेशव्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर योद्धा होते. त्यातील एक म्हणजे सकल शास्त्रपारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री! श्रीमंतांच्या दरबारातील साक्षात बृहस्पती! त्यांना पेशव्यांच्या दरबारात अनन्यसाधारण महत्त्व होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली 'फुलवंती' कादंबरी चित्रपटाच्या स्वरुपात आपल्यासमोर येत आहे. या चित्रपटात व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा दाखवण्यात येणार आहे. व्यंकट शास्त्री यांची भूमिका अभिनेता गश्मीर महाजनी साकारत आहे.

'फुलवंती' चित्रपटामधील गश्मीर महाजनीची झलक : 'फुलवंती'च्या भूमिकेत चतुरस्त्र अभिनेत्री प्राजक्ता माळी दिसणार आहे. व्यंकट शास्त्री यांचे व्यक्तिमत्व, त्यांची बुद्धिमत्ता आणि चारही दिशांना पसरलेली त्यांची कीर्ती हे सर्व आपल्याला या ऐतिहासिकपटातून पाहायला मिळणार आहे. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली आहे. गश्मीर महाजनीनं आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी चित्रपटांसह, हिंदी मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमधून त्यानं खूप लोकप्रियता मिळवली आहे. गश्मीर महाजनी 'फुलवंती' चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे. पेशवाई काळातील 'फुलवंती' नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकट शास्त्री यांची दमदार कहाणी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

'फुलवंती' कधी होणार रिलीज : 'फुलवंती' चित्रपटाच्या निमित्तानं वेगळ्या भूमिका करण्याचा आनंद गश्मीरनं व्यक्त केला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात येत असल्यानं अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत. हा चित्रपट पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहे. 'फुलवंती' मंगेश पवार अ‍ॅन्ड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. 'फुलवंती' चित्रपटाचं दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी या चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रॉडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी 'फुलवंती' चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तसंच या चित्रपटाचे सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्यूझिकनं सांभाळली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.