ETV Bharat / entertainment

गणपती बाप्पा मोरया! बॉलिवूडनं केलं बाप्पाचं जल्लोषात स्वागत, अक्षय आणि समांथासह 'या' स्टार्सनी दिल्या शुभेच्छा - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganeshotsav 2024: गणेशोत्सव 2024 च्या निमित्तानं अनेक बॉलिवूड आणि साऊथ सेलिब्रिटींनी चाहत्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. आता अनेक सेलिब्रिटींनी बाप्पाचं मोठ्या थाटामाटात घरी स्वागत केलं आहे. त्याची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ganesh Chaturthi 2024
गणेश चतुर्थी 2024 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 2:25 PM IST

मुंबई Ganeshotsav 2024 : आज संपूर्ण देशात गणपती बाप्पाचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात येत आहे. आता यात बी टाऊनचे सेलिब्रिटी कसे मागे राहतील. नेहमीप्रमाणे यंदाही बॉलिवूडसह साऊथ चित्रपटसृष्टीत गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सध्या बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंतचे सर्व स्टार्स गणपती बाप्पाचा जयजयकार करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या घरी बाप्पाची स्थापना केली आहे. अक्षय कुमार, समांथा रुथ प्रभू, अल्लू अर्जुन यांसारख्या स्टार्सनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणेश उत्सव हा प्रत्येकांसाठी खूप विशेष असतो.

Ganesh Chaturthi 2024
गणेश चतुर्थी 2024 (instagram)
Ganesh Chaturthi 2024
गणेश चतुर्थी 2024 (instagram)
Ganesh Chaturthi 2024
गणेश चतुर्थी 2024 (instagram)

स्टार्सनं दिल्या शुभेच्छा : दरम्यान बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं गणपती बाप्पाचा फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहे. तर समांथा रुथ प्रभूनं देखील आपल्या घरात बसलेल्या बाप्पाचा फोटो शेअर करुन चाहत्यांना या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देताना अनिल कपूर यांनी लिहिलं, "गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा." तसेच अल्लू अर्जुननं एक फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सनी देओलनं सोशल मीडियावर या विशेष प्रसंगी लिहिलं, "गणेश चतुर्थीच्या निमित्तानं तुम्हाला समृद्धी लाभो, खूप खूप शुभेच्छा."

Ganesh Chaturthi 2024
गणेश चतुर्थी 2024 (instagram)
Ganesh Chaturthi 2024
गणेश चतुर्थी 2024 (instagram)
Ganesh Chaturthi 2024
गणेश चतुर्थी 2024 (instagram)
Ganesh Chaturthi 2024
गणेश चतुर्थी 2024 (instagram)
Ganesh Chaturthi 2024
गणेश चतुर्थी 2024 (instagram)

सेलिब्रिटींनी मोठ्या थाटामाटात बाप्पाचं केलं स्वागत : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं पती रणवीर सिंगबरोबर सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. याशिवाय अंकिता लोखंडेनं तिच्या घरी गणपती बाप्पाचं मोठ्या थाटामाटात स्वागत केलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी अंकिता आणि तिची आई मुंबईतील अनेक पंडालमध्ये गणेशाची मूर्ती निवडताना दिसल्या. बाप्पाचे स्वागत करताना अंकितानं तिच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारती सिंगनंही तिच्या घरी मोठ्या थाटामाटात बाप्पाचं स्वागत केलंय. अर्जुन कपूर, ईशा गुप्ता, तमन्ना भाटिया, सोनू सूद, संजय दत्त आणि इतर कलाकारांनी देखील सोशल माध्यमातून या विशेष प्रसंगी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.