मुंबई - Love In Vietnam : 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये यावेळी भारतीय अभिनेत्रीचा बोलबाला होता. आता भारतीय चित्रपट, कानमध्ये कहर करत आहेत. दरम्यान, कानमधून भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण समोर आला आहे. 'लव्ह इन व्हिएतनाम' हा भारत-व्हिएतनामच्या सहकार्यानं बनलेला पहिला चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हल 2024मध्ये लॉन्च करण्यात आला. 'लव्ह इन व्हिएतनाम'चं फर्स्ट लूक पोस्टर कान 2024 मध्ये अनावरण केल्यानंतर हा चित्रपट आता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 'लव्ह इन व्हिएतनाम' या चित्रपटात भारतीय अभिनेत्री अवनीत कौर आणि व्हिएतनामी अभिनेत्री खा नगान महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
'लव्ह इन व्हिएतनाम' फर्स्ट लूक : तसेच 'लव्ह इन व्हिएतनाम' चित्रपटात गंगूबाई काठियावाडी फेम अभिनेता शांतनु माहेश्वरी देखील प्रमुख भूमिकेत आहे. आता शेअर केलेल्या पोस्टरमध्ये या चित्रपटामधील प्रमुख स्टार कास्टची झलक दिसत आहे. दरम्यान, अवनीत कौरनं कानमधून काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या पोस्टवर तिनं लिहिलं, "कानमध्ये 'लव्ह इन व्हिएतनाम' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना अभिमान वाटत आहे, भारत आणि व्हिएतनामच्या फिल्म इंडस्ट्रीचे हे पहिले सहकार्य आहे, मी खूप आनंदी आहे." 'लव्ह इन व्हिएतनाम' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राहत शाह काझमी यांनी केलं आहे.
वर्कफ्रंट : या चित्रपटाची निर्मिती ओमंग कुमार, राहत शाह काझमी, कॅप्टन राहुल, अभिषेक अंकुर यांनी केली आहेत. तारिक खान, झेबा साजिद आणि सॅमटेन हिल्स, दलत हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाला व्हिएतनाममधील हो ची मिंन सिटी येथील भारतीय वाणिज्य दूतावास, मुंबईतील व्हिएतनामचे महावाणिज्य दूतावास आणि व्हिएतनाम एअरलाइन्स यांनी समर्थन दिलं आहे. दरम्यान शांतनु माहेश्वरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो ' क्रॉसफायर' आणि 'औरों में कहाँ दम था' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अजय देवगण, तब्बू,आणि जिमी शेरगिल देखील असणार आहे.
हेही वाचा :
- गाण्याच्या अनधिकृत वापराबद्दल इलैयाराजांनी 'मंजुम्मल बॉईज'च्या निर्मात्यांना दिली कॉपीराइट नोटीस - Manjummel Boys
- 'द अकादमी'नं 'कलंक'मधील आलिया भट्टचा डान्स व्हिडिओ केला शेअर - THE ACADEMY GHAR MORE PARDESIYA
- शाहरुख खानला लागला उन्हाचा चटका, अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल - SHAH RUKH KHANS HEALTH DETERIORATED