ETV Bharat / entertainment

धनुषच्या D50 च्या फर्स्ट लूकचे काउंटडाऊन सुरू, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला - धनुष

Dhanush D50 first look : धनुषच्या आगामी D50 चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली आहे की, चित्रपटातील त्याचा पहिला लूक सोमवारी संध्याकाळी 6 वाजता समोर येईल. हा चित्रपट धनुषचा दुसरा दिग्दर्शकीय चित्रपट आहे.

Dhanush D50 first look
धनुषच्या D50 चा फर्स्ट लूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 2:55 PM IST

हैदराबाद - Dhanush D50 first look : साऊथ स्टार धनुषच्या आगामी 'D50' चित्रपटातील फर्स्ट लूकची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना आनंदाची बातमी कळवण्यात आली आहे. अवघ्या काही तासातच आज म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता हा लूक लॉन्च केला जाणार आहे.

चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊस सन पिक्चर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. धनुषच्या दुसऱ्या दिग्दर्शनाची कलाकृती असलेल्या या चित्रपटात दुशरा विजयन, संदीप किशन, एसजे सूर्या आणि अपर्णा बालमुरली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. असे असले तरी निर्मात्यांनी चित्रपटाच्या कलाकारांची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नसून ही नावे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

सोमवारी इंस्टाग्रामवर प्रॉडक्शन हाऊसने एक व्हिज्युअल शेअर केले. यामध्ये घोषणा केली की धनुषच्या D50 चा पहिला लूक आज संध्याकाळी 6 वाजता बाहेर येईल. व्हिज्युअल्ससह सन पिक्चर्सने कॅप्शनमध्ये लिहिले, "शेवटी, हा डी डे आहे. D50 चा पहिला लूक आज संध्याकाळी 6 वाजता.!"

या अपडेटवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, "धनुष खूप प्रतिभावान अभिनेता आहे." दुसऱ्याने कमेंट केली, "एक दिग्दर्शक म्हणून धनुष आग आहे." एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, " जास्त काळ प्रतीक्षा करू शकत नाही!!" इतरही युजर्सनी आपला उत्साह दाखवत पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये इमोजींचा वर्षाव केला आहे.

दरम्यान,अभिनेता धनुष त्याच्या आगामी 'D51' नावाच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कममुला करत असून इतर कलारांकह धनुष यामध्ये मुख्य भूमिका साकरत आहे. विशेष म्हणजे या चित्रपट नागार्जुनही काम करत असल्यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. शिवाय यात रश्मिका मंदान्नाचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे.

हेही वाचा -

  1. विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती?, सोशल मीडियावरील चर्चांना रितेश देशमुखचा एकाच वाक्यात रिप्लाय
  2. विमानाचे अपहरण करण्यांना धूळ चारण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा सज्ज, योद्धाचा टीझर रिलीज
  3. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टायटल ट्रॅक रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.