मुंबई - Fardeen khan and Heeramandi : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी' ही वेब सीरीज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. भन्साळी 'हिरामंडी' या वेबसीरीजच्या माध्यामातून ओटीटीच्या जगात प्रवेश करत आहेत. 'हिरामंडी' या वेब सीरीजचं सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकताच 'हिरामंडी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. 'हिरामंडी' सीरीजद्वारे फरदीन खान 14 वर्षांनंतर चित्रपट जगतात पुनरागमन करत आहे. काल 9 एप्रिल रोजी ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान फरदीन खाननं त्याच्या पुनरागमनाबद्दल सांगितलं, यादरम्यान तो भावूक झाला होता. यानंतर त्यानं आणि वेब सीरीजमध्ये भूमिका दिल्याबद्दल संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले.
फरदीन खान भावूक झाला : ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान फरदीन म्हणाला, ''माझ्यासाठी हा खूप मोठा गॅप आहे, जवळपास 14 वर्षे झाली आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल मी संजय लीला भन्साळी आणि नेटफ्लिक्सचा खूप आभारी आहे. हा क्षण खूप भावूक करणारा आहे. संजयजींनं तयार केलेली पात्रे ही गंभीर आणि ठाम विचाराची असतात. त्यांना समजून घेणे सोपे नाही. संजयजींबरोबर काम करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. या कार्यक्रमात फरदीन बोलताना भावूक होताना दिसला. फरदीन हा भन्साळीं यांच्या 'हीरामंडी'मध्ये वली मोहम्मदची भूमिका साकारत आहे. तो शेवटी 2010 मध्ये प्रदर्शित झालेला 'दुल्हा मिल गया' या चित्रपटामध्ये दिसला होता.
'हिरामंडी' वेब सीरीजबद्दल : फरदीन खान व्यतिरिक्त 'हिरामंडी' वेब सीरीजमध्ये शेखर सुमन, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, अध्ययन सुमन आणि शर्मीन सहगल दिसणार आहेत. ही वेब सीरीज 1 मे 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. सध्या या वेब सीरीजबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. संजय भन्साळी या वेब सीरीजद्वारे सर्वांना एका करिश्माई दुनियेत घेऊन जाणार आहेत. 'हिरामंडी' वेब सीरीजची कहाणी 1940च्या दशकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित, वेश्या आणि त्यांच्या ग्राहकांच्या फिरणारी आहे.
हेही वाचा :