मुंबई - अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझनं बहुप्रतीक्षित दिल-लुमिनाटी टूरला सुरुवात करताना मंचावर धमाकेदार पद्धतीनं प्रवेश केला. दिलजीतनं त्याच्या पहिल्या गाण्यानंतर स्टेजवर भारताचा झेंडा फडकावला होता. आता या शोमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर अनेक यूजर्स भरभरून कमेंट्स करून त्याचे कौतुक करत आहेत. दिलजीतनं त्याच्या दिल-लुमिनाटी टूरच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 26 ऑक्टोबरपासून दिलजीतनं कॉन्सर्टची सुरूवात केल्यानंतर, आता अनेकजण व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या पोस्टवर तिकिट न मिळल्याचं दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत.
दिलजीत दोसांझनं तिरंगा फडकवला : या शोमध्ये दिलजीतनं काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. त्यानं यावेळी आपल्या दमदार गायनानं दिल्लीत खळबळ उडवून दिली. त्यानं पहिलं गाणं पूर्ण केले आणि काही सेकंदांनंतर, जेव्हा तो तिरंगा फडकावताना दिसला तेव्हा लोक आनंदाने डान्स करू लागले. दिलजीतची देशावरील प्रेम दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील त्यानं त्याच्या कॉन्सर्टमध्ये आपले देशावरील प्रेम व्यक्त केले आहेत. दिल-लुमिनाटी टूरच्या पहिल्या दिवशी देशाबद्दलचे प्रेम दाखवत दिलजीतनं म्हटलं, 'हा माझा देश, माझे घर आहे! माझा जन्म भारतात झाला याचा मला आनंद आहे.'
Diljit 🌪️ Storm in DELHI 🇮🇳#DiljitDosanjh #Delhi #India pic.twitter.com/XcOQjvwYom
— Diljit Dosanjh Fans Club (@diljitdosanjhfb) October 26, 2024
दिलजीतचा कॉन्सर्ट धमाकेदार : यानंतर त्यानं चाहत्यांचे प्रेम आणि समर्थनाबद्दल आभार मानले. शो सुरू होण्याच्या काही तास आधी जवाहरलाल नेहरू स्टेडियमध्ये अनेक चाहते रांगेत उभे असल्याचे दिसले. दिलजीतचा शो पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. दिलजीतनं दिल्लीपूर्वी, युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, आणि न्यूझीलंडमध्ये कॉन्सर्ट केले आहेत. या कॉन्सर्टची देखील खूप चर्चा सोशल मीडियावर झाली होती. दरम्यान दिलजीतचा कॉन्सर्ट वेळेवर सुरू न झाल्यानं चाहत्यांची थोडी निराशा झाली. दिलजीतनं रात्री आठच्या सुमारास दमदार एन्ट्री केल्यानं चाहत्यांना दिलासा मिळाला. याशिवाय अनेक चाहत्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर लाइव्ह पाहण्याचा आनंद शेअर केला आहे. दिलजीतच्या कॉन्सर्टमुळे मध्य दिल्लीतील लोधी रोडसह स्टेडियमच्या आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
हेही वाचा :