चेन्नई - रजनीकांतची कॅमिओ भूमिका असलेला 'लाल सलाम' चित्रपट आज 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या रिलीजच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत रजनी फॅन्सनी जोरदार सेलेब्रिशन केल्याचं चित्र अनेक शहरातून पाहायला मिळालं. चेन्नईतील रोहिणी थिएटरच्या बाहेर रजनीकांतचा भव्य कटआऊट उभारण्यात आला असून त्याला हार घालण्यात आले. रस्तोरस्ती चित्रपटाचे पोस्टर्स, बॅनर्स लावून त्याला हार घालण्यात आले आहेत. चित्रपटातील सुपरस्टार पाहण्याची चाहत्यांची क्रेझ या दृश्यांमधून दिसून येते. ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित ‘लाल सलाम’ या चित्रपटात रजनीकांतने विशेष भूमिका साकारली आहे.
![Rajinikanth Lal Salaam](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/09-02-2024/r1_0902newsroom_1707452186_503.jpg)
तत्पूर्वी, मेगास्टार रजनीकांतची भूमिका असलेल्या 'लाल सलाम'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह प्रदर्शनाची जोरदार तयारी केली होती. पोस्टरमध्ये रजनीकांत आणि विष्णू विशाल यांना पार्श्वभूमीत जुनी इमारत आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच लाल रंगाच्या पॅलेटसह विंटेज कारसमोर उभे असलेले रजनीकांत दिसत आहेत. रजनीकांत या चित्रपटात मुख्य भूमिका करत नसला तरी त्याची यात निर्णयक भूमिका आहे. पूर्वी रजनीकांतचे वर्षातून एकाहून अधिक चित्रपट रिलीज व्हायचे, पण अलिकडे याला मर्यादा आल्यामुळे त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक रिलीजची डोळ्यात तेल घालून प्रतीक्षा करत असतात.
![Rajinikanth Lal Salaam](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/09-02-2024/r2_0902newsroom_1707452186_27.jpg)
'लाल सलाम' चित्रपटाचे दिग्दर्शन करणारी रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिनेही इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दलचा आपला उत्साह दाखवून दिला. या पोस्टरमध्ये आजूबाजूला जातीय दंगल सुरू असताना रजनीकांत भूमिका करत असलेले मोईदीनभाई अतिशय निर्धाराने मुंबईच्या रस्त्यावरुन चालताना दाखवले आहे.
![Rajinikanth Lal Salaam](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/09-02-2024/r3_0902newsroom_1707452186_286.jpg)
'लाल सलाम'मध्ये रजनीकांत विस्तारित कॅमिओच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला ए आर रहमानचे संगीत असेल. चित्रपटाचा मनोरंजक ट्रेलर देखील बाहेर आला असून त्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
![Rajinikanth Lal Salaam](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/09-02-2024/r4_0902newsroom_1707452186_903.jpg)
रजनीकांत अलीकडेच 'जेलर'मध्ये दिसला होता. हा चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आपल्या पोलीस मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका निडर व्यक्तीची भूमिका रजनीकांतने साकारली होती. या चित्रपटात मोहनलाल, शिवराजकुमार आणि जॅकी श्रॉफ हे महत्त्वाच्या भूमिकेत होते.
हेही वाचा -