मुंबई Natasa Stankovic Ex Boyfriend : मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक त्यांच्या नात्यातील दुराव्यामुळे ते आजकाल खूप चर्चेत आहेत. 18 जुलै रोजी अधिकृतपणे त्यांनी वेगळं होण्याची घोषणा केली. विभक्त होण्याच्या एका महिन्यानंतर, हार्दिकबद्दल अफवा उडू लागल्या की तो एका ब्रिटीश गायिकेला डेट करत आहे. याशिवाय नताशाचा एक्स बॉयफ्रेंड देखील तिच्यावर खास पद्धतीनं प्रेमाचा वर्षाव करत आहे. हार्दिक पांड्यापूर्वी नताशा स्टॅनकोविच टीव्ही अभिनेता अली गोनीला डेट करत होती. रिपोर्ट्सनुसार अली आणि नताशानं 2014 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. दोघांनी एकमेकांना 4 वर्षे डेट केलं.
नताशाच्या पोस्टवर अलीची प्रतिक्रिया : एका रिॲलिटी शोदरम्यान अलीनं सांगितलं होतं की, ब्रेकअपनंतरही ते एकमेकांना भेटायचे. दोघंही 5 वर्षे एकत्र राहिले. एका शो दरम्यानच अलीनं अधिकृतपणे जाहीर केलं होतं की तो आणि नताशा आता वेगळे झाले आहेत. अलीनं त्यांच्या विभक्त होण्याचं कारण म्हणून भिन्न धर्म आणि संस्कृतींचा उल्लेख केला होता. दरम्यान हार्दिक पांड्यापासून वेगळे झाल्यानंतर नताशा ही मुलगा अगस्त्यबरोबर सर्बियामध्ये आहे. नताशा इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच तिनं सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना नताशानं "ग्लॅम अॅन्ड गो" कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
नताशाची पोस्ट व्हायरल : नताशाचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनीनं तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं तिच्या पोस्टला लाईक केलं आहे. अलीनं नताशाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यानं नताशाची पोस्ट लाईक केली होती. सध्या अली गोनी टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तो अनेकदा आपल्या गर्लफ्रेंडबरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. दरम्यान नताशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 'डेडी', 'फ्राईडे', 'लुप्त', '7 ऑवर्स टू गो' आणि 'ॲक्शन जॅक्सन'मध्ये काम केलं आहे.
हेही वाचा :
- हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट केल्यानंतर नताशानं मुलाबरोबर 'असा' वाढदिवस केला साजरा - Natasa Stankovic share pics
- हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर, नताशा स्टॅनकोविकने मुलगा अगस्त्यसह दिली सर्बियातील संग्रहालयाला भेट - NATASA STANKOVIC
- हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोविचची पहिली सोशल मीडिया पोस्ट - Natasa Stankovic post