मुंबई Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये ती वेदांग रैनाबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. दरम्यान 6 सप्टेंबर शुक्रवारी, आलियानं तिच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख घोषीत करून चाहत्यांना एक भेट दिली आहे. याशिवाय तिनं चित्रपटामधील पोस्टर देखील शेअर केलं आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्टर शेअर करताना, तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "दम है...सत्या में दम है!' जिगरा टीझर ट्रेलर 8 सप्टेंबर रोजी रिलीज होईल." 'जिगरा' या चित्रपटामधील पोस्टर लक्षवेधक आहे.
आलियाचा अनोखा अंदाज : या चित्रपटामध्ये आलिया ही ॲक्शन करताना दिसणार असल्याचं सध्या पोस्टरवरून दिसत आहे. पोस्टरमध्ये आलिया ही लाल आणि नारिंगी रंगांच्या पार्श्वभूमीवर उभी आहे, तिच्या मागे एक मोठी ड्रॅगनची मूर्ती दिसत आहे. चमकदार कंदील सारख्या गुंतागुंतीच्या तपशीलांनी भरलेल्या पोस्टरमध्ये आलियाचं गंभीर रुप दिसत आहे. वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन इटर्नल सनशाईन प्रॉडक्शनच्या सहकार्यानं तयार केला आहे.आता अनेकजण आलियाला या नव्या अवतारामध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
'जिगरा' चित्रपटाबद्दल : या चित्रपटात आलिया भट्ट आणि वेदांग रैनाबरोबर आदित्य नंदा देखील दिसणार आहे. दरम्यान आलियाच्या पोस्टमधील कॅप्शनद्वारे सूचित केल्याप्रमाणे, ही एक आकर्षक कहाणी असल्याचं वाटत आहे. हा चित्रपट धैर्याच्या थीमवर लक्ष केंद्रित करणार आहे. 'जिगरा' चित्रपट 11 ऑक्टोबर, 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. दरम्यान आलियानं शेअर केलेल्या पोस्टवर आता अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, "जिगरा हा चित्रपट खूप जबरदस्त असणार आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "या चित्रपटाद्वारे आलिया रुपेरी पडद्यावर आग लावेल." आणखी दुसऱ्यानं लिहिलं, "जिगरा' चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
हेही वाचा :