ETV Bharat / entertainment

दिवाळीनिमित्त करीना कपूर खान ते सोनाक्षी सिन्हापर्यंत बी टाउन सेलेब्सनं दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, पोस्ट व्हायरल - B TOWN CELEBS CELEBRATION

दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात बी टाऊन सेलेब्स साजरा करत आहेत. आता काही स्टार्सनं फोटो पोस्ट करून दिवाळीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

diwali festival
दिवाळीचा सण (दिवाली 2024 (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 31, 2024, 5:28 PM IST

मुंबई : देशभरात आज दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आता बी टाऊन सेलेब्स देखील दिवाळी सणाचा आनंद घेत आहे. याशिवाय काही सेलेब्सनं चित्रपटामधील नवीन पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तर काहींनी त्यांच्या दिवाळीच्या सेलिब्रेशनची झलकही सोशल मीडियावर शेअर केली आहे. चला तर मग जाणून घेऊया यावेळी बॉलिवूड सेलेब्स दिवाळी कशी साजरी करत आहेत.

करिना कपूर खाननं शेअर केला दिवाळीनिमित्त फोटो : करीना कपूर खाननं तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर असल्याची दिसत आहे. ती कुठे गेली याबाबत माहिती नसली तरी तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान करिनानं इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये फोटो शेअर करताना लिहिलं,'स्वप्न पाहण्याची हिंम्मत करा...पुढे पाहा...प्रकाशाचा अनुभव घ्या...मित्रांनो दिवाळीच्या शुभेच्छा 2024.' आता करीनानं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण तिला दिवाळीसाठी शुभेच्छा देत आहेत. समुद्रकिनाऱ्याच्या फोटोत करीना ही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आहे. तिचा हा फोटो आता अनेकांना आवडत आहेत.

सोनाक्षीनं पती झहीरबरोबरचे फोटो केले शेअर : सोनाक्षी सिन्हानं पती झहीर इक्बालबरोबरचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे दोघेही या फोटोमध्ये सुंदर दिसत आहेत. या फोटोत सोनाक्षी हिरव्या रंगाचा पोशाखमध्ये दिसत आहे. दुसरीकडे झहीरनं काळा कुर्ता आणि राखाडी पँट परिधान केला आहे. हे फोटो शेअर करताना सोनाक्षीनं कॅप्शन लिहिलं, 'दिवाळीच्या शुभेच्छा, प्रत्येक घरात प्रकाश, प्रत्येक घरात आनंद हीच आमची सर्वांसाठी प्रार्थना.' दरम्यान या फोटोवर सोनाक्षीचे चाहते तिला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन तिचे कौतुक करत आहेत. तिनं शेअर केलेले फोटो आता तिच्या चाहत्यांना आवडत असून यावर अनेकजण हार्ट आणि फायर पोस्ट करत आहेत. दरम्यान अल्लू अर्जुन, तारा सुतारिया, दिशा पटानी, महेश बाबू, अक्षय कुमार, तमन्ना भाटिया यांसारख्या स्टार्सनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. करीना कपूर खाननं तिच्या वाढदिवशी केली पोस्ट शेअर, सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा - Kareena Kapoor
  2. करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह पापाराझीवर संतापला, व्हिडिओ व्हायरल - kareena kapoor
  3. Sonakshi Sinha birthday : शत्रुघ्न सिन्हाने लेक सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्य केला कौतुकाचा वर्षाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.