मुंबई - पंजाबी गायक दिलजीत दोसांझ भारतातील सर्वात सुंदर ठिकाण काश्मीरला गेल्याचं समजत आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो काश्मीरमधील सुंदर वातावरणाचं आनंद घेताना दिसत आहे. याशिवाय त्यानं इंस्टाग्राम स्टोरीवर देखील काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये तो मंदिरात असल्याचा दिसत आहे. दरम्यान दिलजीतच्या काश्मीरमधील व्हिडिओच्या पोस्टवर अनेकजण आपल्या कमेंट्स देऊन प्रतिक्रिया देत आहेत. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
दिलजीत दोसांझचा काश्मीरमधील व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, 'पूर्ण भारतावर भाईचा ताबा आहे.' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'पाजी एक शो जम्मू आणि कश्मीरमध्ये घ्या.' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'कश्मीरवर हल्ला करणार आता दिलजीत पाजी.' याशिवाय काहीजणांनी या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून दिलजीतवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिलजीत काश्मीरच्या जादुई दृश्यांभोवती फेरफटका मारत असून वाळलेल्या पानांवर चालत असल्याचं दिसत आहे. याशिवाय तो एका झाडावर आपले मस्तक देखील टेकवत आहे. हिवाळ्यातील काश्मीर हे विलक्षण दृश्य पाहूण दिलजीत हा प्रभावित झाल्याचा दिसत आहे.
दिलजीत दोसांझचा 'या' ठिकाणी होणार पुढचा शो : व्हायरल झालेल्या व्हिडिओत हिवाळ्यातील काश्मीरमधील विलक्षण दृश्य, सभोवतालची शांतता, थंड हवामान, आणि ताजेपणा, यात दिसत आहे. पृथ्वीवरील स्वर्ग हे काश्मीरला समजतात. दरम्यान दिलजीत सध्या दिल-लुमिनाटी टूरसाठी देशभर फिरत आहे. कॉन्सर्टसाठी भारतीय शहरांना भेट देत असताना देखील दिलजीतनं स्थानिक पर्यटन अनुभवांसाठी व्यग्र वेळापत्रकामधून थोडा वेळ काढला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून लागोपाठ शोनंतर त्याला या ब्रेकची गरज होती. याशिवाय आतापर्यंत दिलजीतचे शो दिल्ली, कोलकाता , चंदीगड, बेंगळुरू, पुणे, जयपूर आणि इंदूर याठिकाणी झाले आहेत. आता त्याचा पुढचा शो हा मुंबईमध्ये 19 तारखेला आहे. आता या शोसाठी अनेकजण उत्सुक आहेत.
हेही वाचा :