मुंबई - गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला अमर सिंग चमकीला हा चित्रपट लवकरच ओप्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी चाहत्यांमध्ये उत्कंठा निर्माण करण्यासाठी, निर्माते त्यांना नवीन गाण्यांची भेट देत आहेत. गुरुवारी, निर्मात्यांनी अल्का याज्ञिक, रिचा शर्मा, पूजा तिवारी आणि यशिका सिक्का यांनी गायलेले 'नरम कालजा' नावाचे आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दोन मिनिटे आणि बावन्न सेकंदाच्या गाण्यात, दिलजीत आणि परिणिती एका महिलेच्या मागे जाताना दिसत आहेत. त्याने पूर्वी गायलेल्या एका गाण्यात स्त्रीयांबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याची चर्चा ती महिला करत आहे. चमकिलाची गाणी वेगळी नाहीत, तर त्या प्रकारचा विचार पुरुष नेहमीच करत असतात असे एक वृद्ध महिला सांगताना दिसते. नंतरच्या दृष्यात काही मुली अमरसिंग चमकिलाची गाणी चोरुन ऐकताना दिसतात. त्याची गाणी इतकी लोकप्रिय असतात की महिलांच्या ओठांवर ती सहज येतात. शेतात काम करताना, येता जाता, फरसतीच्या क्षणी, कामाचा थकवा भागवण्यासाठी महिलाही त्याची गाणी गुणगुणतात आणि हेच 'नरम कालजा' गाण्याचे वैशिष्ठ्य आहे.
हे गाणे एका स्त्रीवर तिचे स्वातंत्र्य आणि लवचिकता यांची अभिव्यक्ती आहे. पंजाबी शब्दांचा सुंदर वापर केलेलं हे गाणं सामाजिक नियम आणि परंपरांना झुगारून देते, तसेच नातेसंबंध आणि लैंगिक भूमिकांच्या गुंतागुंतींमध्ये निर्भयपणे विचार करायला शिकवते. इर्शाद कामिल यांनी लिहिलेल्या, 'नरम कालजा' गाण्याला ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलंय. यासाठी गाण्यातील बासरीच्या मधुर नोट्स पारस नाथ यांनी वाजवल्या आहेत, कीथ पीटर्सने बासवादक म्हणून योगदान दिले आहे. सोशल मीडियावर गाणे शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "चमकिला मेरे अंदर भी बोले सदा."
इम्तियाज अली दिग्दर्शित 'अमर सिंग चमकिला' हा चित्रपट याच नावाच्या पंजाबी गायकाच्या जीवनावर आधारित आहे. संपूर्ण पंजाबी भाषिकांमध्ये लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेला अमर सिंग चमकिला 1980 च्या दशकात गाण्याच्या सर्वाधिक कॅसेट्स विकल्या गेलेल्या भारतीय संगीतकारांपैकी एक होता. 27 व्या वर्षी त्याची पत्नी आणि दोन बँड सहकाऱ्यांसह त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यातच त्याचे निधन झाले. मोहित चौधरी, सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी, सारेगामा आणि विंडो सीट फिल्म्स यांनी बनवलेला, 'अमर सिंग चमकिला' हा बायोपिक १२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे.
हेही वाचा -