ETV Bharat / entertainment

'देवरा - भाग 1' च्या अंतिम शूटसाठी ज्युनियर एनटीआर सज्ज, पाहा कधी आहे शूटिंग - Jr NTR - JR NTR

ज्यनियर एनटीआर त्याच्या 'देवरा भाग 1' या चित्रपटासाठी अंतिम टप्प्यातील शूटिंग करत आहे. हा पॅन इंडिया चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी रिलीज करण्याचं ठरलं असल्यामुळे दिग्दर्शक कोरटाला सिवा यांनी त्यांच्या शूटिंगचे नियोजन केलंय.

Jr NTR
ज्युनियर एनटीआर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 1:09 PM IST

मुंबई - साऊथ सुपरस्टार ज्यनियर एनटीआर त्याच्या बहुचर्चित 'देवरा भाग 1' या चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. 'आरआरआर' चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर या चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सध्या त्याला मुंबई आणि हैदराबाद असा सतत प्रवास करावा लागतो. कारण त्याच्या बॉलिवूड पदार्पणाच्या 'वॉर 2' या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत होतंय आणि 'देवरा'चं शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. 'वॉर 2' या चित्रपटाला प्राधान्य असले तरी त्याची 'देवरा'बाबत एक कमिटममेंट आहे. कोरटाला सिवा दिग्दर्शित या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग पूर्ण झालंय आणि हा चित्रपट आता अंतिम टप्प्यात आला आहे. या चित्रपटातून सैफ अली खान आणि जान्हवी कपूर तेलुगू चित्रपटसृष्टीत उतरणार आहेत.

युवसुधा आर्ट्स आणि एनटीआर आर्ट्स यांची निर्मिती असलेला 'देवरा भाग 1' हा चित्रपट ज्युनियर एनटीआरचा सावत्र भाऊ नंदामुरी कल्याण राम यांनी सादर केला आहे. हा महत्त्वाकांक्षी पॅन इंडिया चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. रिलीजची तारीखेपूर्वी संकलनाचे का पूर्ण करण्यासाठी

निर्माते मोठ्या प्रमाणावर अंतिम शूटिंगची तयारी करत आहेत. लेटेस्ट अपडेटनुसार 'देवरा - भाग 1' च्या शेवटच्या टप्प्याचे शूटिंग मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. ज्युनियर एनटीआरने त्याच्या बॉलीवूड पदार्पण असलेल्या 'वॉर 2' चे मुंबई शेड्यूल पूर्ण केलं आहे. कोराटला शिवाने 'देवरा'चे जलद आणि परफेक्ट शूटिंग पूर्ण होण्यासाठी निर्मितीचे काळजीपूर्वक नियोजन केले आहे.

दरम्यान, ज्युनियर एनटीआर 'वॉर 2' च्या शूटिंगसाठी मुंबईला परतला आहे. यामध्ये तो हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांच्याबरोबर काम करत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित 'वॉर 2' हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या महत्त्वाकांक्षी स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. याव्यतिरिक्त, या चित्रपटातील ज्युनियर एनटीआरच्या नवीन लूकने प्रेक्षकांमध्ये आणखी आशा निर्माण केली आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर खलनायकाची भूमिका करणार आहे.

हेही वाचा -

  1. बाफ्टा आणि ऑस्करनंतर 'ओपेनहाइमर' फेम स्टार सिलियन मर्फीला मिळाला आणखी एक मानाचा पुरस्कार - Cillian Murphy
  2. 'कल्की 2898 एडी'मधील नवीन प्रोमो रिलीज, अमिताभ बच्चन साकारणार अश्वत्थामाची भूमिका - amitabh bachchan
  3. "यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही"; अभिनेता चिन्मय मांडलेकरनं का घेतला हा निर्णय? - Chinmay Mandalekar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.