ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'ला यश मिळूनही अल्लू अर्जुन दुःखी, महिलेच्या मृत्यबद्दल मनात खंत, 25 लाखांची मदतही केली जाहीर - ALLU ARJUN SADDENED BY WOMAN DEATH

हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणाबद्दल अभिनेता अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया आली आहे. त्यानं पीडितेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Allu Arjun
अल्लू अर्जुन ((IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2024, 3:37 PM IST

मुंबई - 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रीमियर शोदरम्यान एका महिलेचा झालेला मृत्यू आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर दोन दिवसांनी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया आली आहे. 'पुष्पराज'नं शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यानं सांगितलं की, 'या घटनेमुळे तो खूप दु:खी झाला आहे.' पीडितेच्या कुटुंबासाठी त्यानं 25 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. एवढेच नाही तर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचंही त्यानं या व्हिडिओत म्हटलंय.

६ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुननं त्याचा व्हिडिओ त्याच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये सुपरस्टार तेलगूमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तो म्हणाले की, ''संध्या थिएटरमध्ये घडलेल्या दुःखद घटनेनं मी खूप दु:खी आहे. या कठीण प्रसंगी मी पीडितेच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो.''

अल्लू अर्जुन पुढे म्हणाला, ''मी नुकसान भरून काढू शकत नाही, पण मी त्यांना खात्री देतो की या दुःखात ते एकटे नाहीत. मी भावनिकदृष्ट्या त्यांच्याबरोबर आहे. त्यांना माझ्याकडून जमेल ती मदत मी देईन. मी स्वतः पीडितेच्या कुटुंबाला भेटणार आहे. या कठीण काळात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे.''

या घटनेनं 'पुष्पा 2' चित्रपटाची संपूर्ण टीम हादरली असल्याचंही त्यानं आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. त्या कुटुंबाला त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा करत असल्याचंही त्यानं सांगितले. लोकांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमाचा आनंद लुटता यावा यासाठी तो चित्रपट बनवतो, असं त्यानं सांगितलं आणि लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं. हैदराबाद पोलिसांनी गुरुवारी अभिनेता अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि संध्या थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुष्पा 2 प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी आणि महिलेचा मृत्यू

पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबर रोजी जगभर रिलीज झाला. त्याच्या आधी बुधवारी रात्री साडे दहा वाजता प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन हैदराबादच्या आरटीसी क्रॉस रोडवरील संध्या थिएटरजवळ हजर झाला. यावेळी संपूर्ण रस्त्यावर त्याच्या फॅन्सनी अफाट गर्दी केली होती. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये रेवती नामक महिला तिचा पती व दोन मुलांसह आली होती. यामध्ये रेवती व तिचा मुलगा गर्दीत खाली पडले, लोकांनी तुडवल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला तर मुलगाही गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.