ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोणने विमानतळावर दाखवली, 'वेड्या बहिणीची वेडी माया' - अनिशा पदुकोण

दीपिका पदुकोण तिची बहीण अनिशा पदुकोण हिवाळी फॅशनसह विमानतळावर दिसली. यावेळी दीपिका आपल्या लहान बहिणीची काळजी घेत होती. यावेळी तिने बहिणीचा हात पकडून तिला आपल्यासोबत गेटमधून आत घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 12:53 PM IST

मुंबई - हिंदी सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या हृतिक रोशनसह अलिकडेच रिलीज झालेल्या 'फायटर' चित्रपटाच्या यशाचा आनंद आणि अनुभव घेत आहे. आजवर तिच्या असंख्य चित्रपटातील उत्तम अभिनयामुळे तिला सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रस्थापित केले आहे. ती केवळ अभिनयासाठीच नाही तर तिच्या उत्तम ड्रेसिंग सेन्ससाठीही ओळखली जाते. अलिकडेच दीपिकाने तिची लहान बहिण अनिशा पदुकोणसह सुंदर पोशाख घातलेला फोटो क्लिक केला आहे.

दीपिका पदुकोण आणि अनिशा पदुकोण या भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि उज्जला पदुकोण यांच्या मुली आहेत. त्यांच्यात बहिणी म्हणून अतिशय घट्ट नातं आहे. सार्वजनिक कार्यक्रमात आणि मुलाखतींमध्ये वारंवार त्यांच्यातील प्रेमळ नात्याचा प्रत्यय नेहमी पाहायला मिळालाय. सोमवारी सकाळी दोघीही मुंबई विमानतळावर खूपच सुंदर दिसत होत्या.

विमानतळावर अवतरताना दीपिकाने चेकर ओव्हरकोट आणि हलक्या निळ्या डेनिम्ससह जोडलेल्या पांढऱ्या रंगाचा हाय नेक घातला होता. तिचे केस आणि मेकअप देखील परफेक्ट होता. तिच्या कपड्यांना सहजतेने आकर्षक लूक देण्यासाठी दीपिकानं तिचे केस घट्ट, व्यवस्थित बनवलेल्या बनमध्ये बांधले होते. तिच्या ड्रेसला पूरक म्हणून, दीपिकाने तपकिरी रंगाचा गॉगल निवडला होता आणि काळ्या बूटांनी तिचा लूक पूर्ण केला होता.

दुसरीकडे, तिची बहीण अनिशा पदुकोणने हिरव्या रंगाच्या जंपसूटसह एक आकर्षक लूकला प्राधान्य दिलं होतं. विमानतळ टर्मिनलमध्ये प्रवेश करताना अनिशाला तिची बहीण दीपिकाने मार्गदर्शन केले. कामाच्या आघाडीवर दुसरीकडे दीपिकाचा 'फायटर' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. याशिवाय पुढं ती 'कल्कि 2898 एडी'मध्ये प्रभासबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट नाग अश्विननं दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात दीपिका आणि प्रभासशिवाय अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'कल्कि 2898 एडी 9 मई 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल.

हेही वाचा -

  1. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा बेल्जियममध्ये शॉपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल
  2. हृषिकेश मुखर्जींच्या 'बावर्ची'चा होणार रिमेक, अनुश्री मेहतावर दिग्दर्शनाची जबाबदारी
  3. "एक स्वप्न सत्यात उतरले ": ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर शंकर महादेवनची भावना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.