ETV Bharat / entertainment

केट ब्लँचेट, डेव्हिड बेकहॅमसह 'बाफ्टा अवॉर्ड्स'मध्ये प्रेझेन्टर म्हणून सामील होणार दीपिका पदुकोण - बाफ्टा अवॉर्ड्स

BAFTA Awards 2024 : 'बाफ्टा अवॉर्ड्स'मध्ये दीपिका पदुकोणची प्रस्तुतकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. लंडनच्या रॉयल फेस्टिव्ह हॉलमध्ये 19 फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेता केट ब्लँचेट, दुआ लिपा, डेव्हिड बेकहॅम आणि इतर प्रतिष्ठित प्रेझेन्टर्ससह सामील होणार आहे.

BAFTA Awards 2024
बाफ्टा अवॉर्ड्स
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 11:28 AM IST

मुंबई - BAFTA Awards 2024 : अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रतिष्ठित बाफ्टा अवॉर्ड्स (ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) सोहळ्यात बॉलिवूड ग्लॅमरचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. फुटबॉल आयकॉन डेव्हिड बेकहॅम, प्रशंसित अभिनेत्री केट ब्लँचेट आणि चार्ट-टॉपिंग गायक दुआ लिपा यांसारख्या प्रतिष्ठित प्रेझेन्टर्सच्या श्रेणीत दीपिका सामील होत आहे. 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 'बाफ्टा' पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांचा मंचावर गौरव होतानाच्या प्रेझेन्टर्स साक्षीदार असतील.

दीपिका पदुकोण आणि तिच्या सहकारी प्रेझेन्टर्सकडून निवडण्यात आलेल्या विशिष्ट श्रेणीतील विजेत्यांना प्रेक्षकांसमोर सादर करण्याची आणि कार्यक्रमात त्यांच्या योगदानाची अपेक्षा जास्त असते. प्रेझेन्टर्सच्या लाइनअपमध्ये ह्यू ग्रँट, लिली कॉलिन्स आणि इद्रिस एल्बा यांसारख्या परिचित नावांचाही समावेश आहे.

जागतिक स्तरावर दीपिका पदुकोणचा सहभाग 'बाफ्टा'मधील तिच्या भूमिकेच्या पलीकडचा आहे. 2023 ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून दिसल्यानंतर, दीपिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय सिनेमाची व्यक्तिरेखा उंचावत आली आहे.

'बाफ्टा' समारंभाची तारीख जवळ येत असल्यामुळे या सिझनमध्ये वाहवा मिळवणाऱ्या स्पर्धकांकडेही लक्ष लागले आहे. 13 नामांकनांसह 'ओपेनहाइमर' हा ऐतिहासिक ड्रामा या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यानंतर गॉथिक कॉमेडी 'पुअर थिंग्ज' आणि मार्टिन स्कोर्सेसच्या 'ग्रिपिंग टेल किलर्स ऑफ द फ्लॉवर मून', या प्रत्येकाला नऊ नामांकन मिळाले आहेत. लंडनच्या रॉयल फेस्टिव्ह हॉलमध्ये बाफ्टा 2024 साठी स्टेज तयार आहे.

अलिकडेच दीपिका पदुकोणची हृतिक रोशनच्या बरोबरीने भूमिका असलेला 'फायटर' हा चित्रपट रिलीज झाला आहे. ती आगामी 'कल्की 2898 एडी' या साय-फाय चित्रपटात अमिताभ, प्रभास अशा दिग्गज कलाकारांसह दिसणार आहे. रोहिट शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन'मध्येही दिसणार आहे. शिवाय रोहितच्या कॉप युनिव्हर्सच्यानव्या मालिकेत शक्ती शेट्टीची भूमिका करणार आहे.

हेही वाचा -

  1. श्रेयस तळपदे झाला पुन्हा सक्रिय, 'ही अनोखी गाठ'चा ट्रेलर रिलीज
  2. वरूण तेजनं 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'साठी रुहानी शर्माचे केलं स्वागत
  3. जॅकलीन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखर विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार, मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाला लागणार वेगळं वळण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.