ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं घेतला फॅमिली डिनरचा आनंद, व्हिडिओ व्हायरल - deepika padukone and ranveer singh - DEEPIKA PADUKONE AND RANVEER SINGH

Deepika Padukone and Ranveer Singh : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण काल रात्री वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. आता त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Deepika Padukone and Ranveer Singh
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (रणवीर-दीपिका (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 1:57 PM IST

मुंबई - Deepika Padukone and Ranveer Singh : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण चालू वर्षात मुलाचे पालक होणार आहेत. दरम्यान दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दीपवीर कुटुंबाबरोबर डिनर डेटला गेल्याचं दिसत आहे. यावेळी हे कपल कॅज्युअल लूकमध्ये दिसले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री- वेडिंगच्या उत्सवात सहभागी होऊन रणवीर सिंग नुकताच इटलीहून परतला आहे. रणवीर-दीपिका 3 जूनच्या रात्री वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना या जोडप्याला पापाराझीनं घेरलं होतं.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण झाले स्पॉट : यावेळी रणवीर सिंगनं निळ्या डेनिमवर पांढरा शर्ट घातला होता आणि दीपिका पदुकोणनं चेक लॉग शर्ट घातला होता. या डिनरमध्ये रणवीर सिंगची सासू देखील फॅशनेबल अंदाजात दिसली. दीपिका पदुकोणच्या आईनं को-ऑर्डरचा सेट घातला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये रणबीर हा दीपिकाचा हात पकडून तिला कारच्या दिशेनं नेत होता. यावेळी रणवीर आणि दीपिका पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. आता अनेकजण या व्हिडिओवर कमेंट्स करून या जोडप्यावर प्रेमाचा शिरकाव करताना दिसत आहेत. दीपिकाचं कौतुक करताना एका चाहत्यानं लिहिलं, "प्रेग्नेंसीमध्ये देखील दीपिका खूप सुंदर दिसत आहे." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "दीपिका आणि रणवीरचं बाळ पाहिण्यासाठी मी खूप उत्सुक आहे." आणखी एकानं लिहिलं, "रणवीर हा दीपिकाची खूप काळजी घेत आहे, सुंदर जोडपं." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

दीपिका पदुकोण कधी होणार आई? : 23 फेब्रुवारीला दीपिका आणि रणवीरनं सोशल मीडियाद्वारे गरोदरपणाची गोड बातमी देऊन आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं. दीपिका आणि रणवीरच्या या गुड न्यूज पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आणि सेलिब्रिटींमध्ये खळबळ उडाली. यानंतर चाहते आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव या जोडप्यावर करण्यात आला. आता या जोडप्याचे चाहते त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. दीपिका पदुकोणनं सांगितलं की ती येत्या सप्टेंबर महिन्यात ती आई होणार आहे.

हेही वाचा :

  1. बॉलिवूड सेलेब्स लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह अपडेट्स, वाचा सविस्तर - lok sabha elections 2024
  2. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर निर्मित नवीन मालिका 'भूमिकन्या'! - New serial Bhumikanya
  3. परीक्षेला न बसता टॉप करु इच्छिणाऱ्या 'बंटी बंडलबाज'ची झाली घोषणा! - Bunty Bundalbaaz

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.