ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा बेल्जियममध्ये शॉपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल - दीपिका आणि रणवीरचा व्हिडिओ व्हायरल

Deepika Padukone and Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे जोडपे शॉपिंग करताना दिसत आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 3:46 PM IST

मुंबई - Deepika Padukone and Ranveer Singh : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण फक्त त्यांच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. सध्या दीपिका पदुकोण तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे, तर रणवीर सिंग शेवटी करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसला होता. आता या स्टार कपलचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे जोडपे बेल्जियममधील एका मॉलमध्ये एकत्र शॉपिंग करत आहे.

मॉलमधील रणवीर आणि दीपिकाचा व्हिडिओ व्हायरल : मॉलमधील या व्हिडिओमध्ये दीपिका कपड्यांची खरेदी करत आहे. व्हिडिओत तिनं काळ्या रंगाच्या आउटफिट परिधान केला आहे. दीपिकानं तिच्या हातात खरेदी केलेले खूप कपडे दिसत आहेत. 44 सेकंदाच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये रणवीर आणि दीपिका हे मॉल बाहेर फिरताना दिसत आहेत. त्याच्या व्हिडिओला अनेकजण लाईक करत आहेत. अलीकडेच या जोडप्यानं त्यांच्या लग्नाचा 5वा वाढदिवस साजरा केला होता. या विशेष प्रसंगी हे जोडपे बेल्जियमला गेले होते. त्याचा हा जुना व्हिडिओ असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. हे कपल अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असतात. रणवीर आणि दीपिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.

वर्कफ्रंट : रणवीर आणि दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'बैजू बावरा' आणि 'शक्तीमान' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'डॉन 3'मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राबरोबर असणार आहे. दुसरीकडे दीपिकाचा 'फायटर' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. याशिवाय पुढं ती 'कल्कि 2898 एडी'मध्ये प्रभासबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट नाग अश्विननं दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात दीपिका आणि प्रभासशिवाय अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'कल्कि 2898 एडी 9 मई 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. 'कल्कि 2898 एडी' 600 कोटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. किरण रावनं आमिर खानच्या समर्थनार्थ केली संदीप रेड्डी वंगावर कमेंट, 'अ‍ॅनिमल' टीमने दिलं प्रत्युत्तर
  2. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरच्या आगामी 'द फॅमिली स्टार'च्या पहिल्या गाण्याची झलक
  3. आमिर खानची मुलगी आयरा खान झाली ट्रोल ; व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.