ETV Bharat / entertainment

'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक पाहून युजर्सना झाली 'पुष्पा'ची आठवण - सिंघम अगेन आणि अर्जुन कपूर

Arjun Kapoor vs Allu Arjun : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. आता सोशल मीडियावर हा लूक पाहून युजर्स अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' चित्रपटाच्या लूकची कॉपी असल्याचं म्हणत आहेत.

Arjun Kapoor vs Allu Arjun
अर्जुन कपूर vs अल्लू अर्जुन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 12:51 PM IST

मुंबई - Arjun Kapoor vs Allu Arjun : अभिनेता अजय देवगण, करीना कपूर खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफ स्टारर कॉप ॲक्शन चित्रपट 'सिंघम अगेन'ची रिलीज जवळ आली आहे. याआधी रोहित शेट्टीनं त्याच्या बहुप्रतीक्षित 'सिंघम अगेन'मधील खलनायकचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहित शेट्टीनं त्याच्या ॲक्शन कॉप चित्रपटासाठी अर्जुन कपूरची खलनायक म्हणून निवड केली आहे. आज 14 फेब्रुवारी रोजी अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटातील अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित : अर्जुन कपूरचा हा लूक साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' चित्रपटाच्या लूकची कॉपी असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार अर्जुनचा फर्स्ट लूक हा जबरदस्त असल्याचं म्हणत आहेत. 'पुष्पा'मध्ये हाच लूक अल्लू अर्जुनचा होता. त्याचा हा लूक प्रचंड गाजला होता. याशिवाय असाच लूक साऊथ स्टार नानी देखील असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. 'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर शक्तिशाली अंदाजात दिसणार आहे. फर्स्ट लूकमध्ये अर्जुनचा चेहरा रक्तानं माखलेला दिसत आहे. याशिवाय त्याची कुरळे केसांची हेअरस्टाईल पाहून अनेकांना 'पुष्पा' या चित्रपटाची आठवण झाली आहे.

बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी होणार प्रदर्शित : 'सिंघम अगेन' आणि 'पुष्पा 2' 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची टक्कर बॉक्स ऑफिसवर होणार आहे. आता अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' आणि अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटांची वाट अनेकजण आतुरतेनं पाहत आहेत. तिकीट खिडकीवर कोणता चित्रपट खळबळ माजवेल हे पाहणं विशेष असणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज सध्या अनेकजण लावत आहे.

हेही वाचा :

  1. हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील कलाकार उत्साहात साजरा करत आहेत 'व्हॅलेंटाईन्स डे'
  2. 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त पाहा काही विशेष रोमँटिक चित्रपट
  3. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूने दिल्या त्यांच्या 'व्हॅलेंटाईन फॉरएव्हर'ला शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.