ETV Bharat / entertainment

पालकत्वाबद्दल 'आय एम लिजन्ड'री शुभेच्छा! दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचं विल स्मिथकडून अभिनंदन - DEEPIKA PADUKONE - DEEPIKA PADUKONE

Will Smith : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग दाम्पत्य आपल्या नुकतेच आपल्या 'रीयल लाइफ'मध्ये पालकत्वाच्या नव्या भूमिकेत प्रवेशकर्ते झाले आहेत. चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांना भरभरुन शुभेच्छा देत आहेत. दरम्यान हॉलिवूड स्टार विल स्मिथनंही त्यांचं अभिनंदन केलं आहे.

Will Smith
विल स्मिथ (विल स्मिथ (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 12, 2024, 2:11 PM IST

मुंबई - Will Smith : बॉलिवूड स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नुकतेच पालक झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर रोजी दीपिकानं एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. दीपवीरच्या घरी लक्ष्मीचं आगमन झाल्यानं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. अनेकजण या जोडप्याला अभिनंदनाचे संदेश पाठवताना दिसत आहेत. आता अमेरिकन हॉलिवूड अभिनेता विल स्मिथनेही रणवीर आणि दीपिकाचं पालक बनल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. विल स्मिथनं दीपवीरच्या गुड न्यूज पोस्टवर अभिनंदन करताना, 'ममा आणि पापा यांचं अभिनंदन' अशा आशयाची पोस्ट केली आहे.

विल स्मिथ हा रणवीरचा मित्र : विल स्मिथचा अभिनंदनाचा संदेश सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. रणवीर आणि विल हे मित्र आहेत. 2018 मध्ये, विलनं करण जोहरबरोबरचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये विलबरोबर रणवीरदेखील दिसत होता. विलनं या पोस्टला कॅप्शन लिहिलं होतं, 'बॉलिवुडमधील दोन सर्वोत्तम व्यक्ती करण जोहर आणि रणवीर सिंगकडून शिकत आहे.' यानंतर विल आणि रणवीर सिंग यांच्यात चांगली मैत्री असल्याचं समजलं होतं. 2019 मध्ये रिलीज झालेला 'गली बॉय' चित्रपट पाहून विलनं रणवीरचं खूप कौतुक केलं होतं. रणवीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

दीपिका आणि रणवीरचं लग्न : दरम्यान दीपवीरनं 2018 रोजी इटलीमध्ये लग्न केलं. लग्नाच्या 6 वर्षानंतर हे जोडपं पालकाच्या भूमिकेत शिरलं आहे. बाळ झाल्यानंतर या जोडप्यानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यात लिहिलं होतं, 'वेलकम बेबी गर्ल 8.9.2024 दीपिका आणि रणवीर.' या पोस्टवर अनेक बॉलिवूड स्टार्सनं दीपवीरचं अभिनंदन केलं होतं. यात कतरिना कैफ, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, निक जोनास, करीना कपूर खान, पार्श्वगायिका श्रेया घोषाल आणि इतर काही सेलिब्रिंटीचा समावेश होता. याशिवाय दीपिकाच्या नवजात कन्येला पाहण्यासाठी मुकेश अंबानी यांनीदेखील हॉस्पिटलला भेट दिली होती.

हेही वाचा :

  1. मुकेश अंबानी यांनी दीपिका पदुकोणच्या बाळाला पाहण्यासाठी हॉस्पिटलला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - Deepika Padukone and Mukesh Ambani
  2. सिद्धिविनायक पावला; दीपिका -रणवीरच्या घरी गणेशोत्सवात आली 'लक्ष्मी' - Ranveer Deepika first child
  3. युजर्सनी दीपिका आणि रणवीरच्या मुलीसाठी सूचवली 'ही' सुंदर नावं, जाणून घ्या याचा अर्थ - Unique Name Suggestions From Fans

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.