मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू स्टारर मोस्ट अवेटेड वेब सीरीज 'सिटाडेल: हनी बनी'चा ट्रेलर , 15 ऑक्टोबर रोजी रिलीज करण्यात आला. या वेब सीरीजचा ट्रेलर हा खूप धमाकेदार आहे. प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल' या हॉलिवूड वेब सीरीजचं हे बॉलिवूड व्हर्जन आहे. त्याच्या हिंदी आवृत्तीत, वरुण धवन आणि सामंथा रुथ प्रभू हनी-बनीच्या भूमिकेत आहेत. प्रदर्शित केलेल्या ट्रेलरमध्ये वरुण आणि सामंथा दोघेही जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहेत. ट्रेलरमध्ये ॲक्शनबरोबर अनेक शिव्याही ऐकाण्यास मिळत आहे.
'सिटाडेल: हनी बनी'चा ट्रेलर रिलीज : ही वेब सीरीज राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी दिग्दर्शित केली आहे. 'सिटाडेल: हनी बनी' ही सीरीज डी2आर (D2R) फिल्म्स, अॅमेझॉन एमजीएम स्टूडिओ आणि रूसो ब्रदर्सच्या एजीबीओनं निर्मित केला आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर हा अनेकांना पसंत पडतोय. दरम्यान हनीच्या भूमिकेत आलेली सामंथा ही एका लहान मुलीच्या आई आणि एजंटची भूमिका बजावत आहे. का दृश्यात ती तिच्या मुलीला सांगते की तिला एक गुपित सांगायचे आहे. त्यानंतर सामंथा म्हणते की, 'मी एजंट होती.' तिची मुलगी म्हणते, 'याचा अर्थ जेम्स बाँडसारखा आहे काय?.'
'सिटाडेल: हनी बनी' कधी होणार प्रदर्शित : याशिवाय दुसरीकडे वरुण हा एका अनाथ बनीच्या भूमिकेत असून तो एक एजंट आहे. 'सिटाडेल: हनी बनी'चा ट्रेलर पाहून आता अनेकजण वरुण आणि सामंथाच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. या वेब सीरीजद्वारे वरुण आणि सामंथा पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यामध्ये के.के. मेनन, सिमरन, सिकंदर खेर, साकिब सलीम, सोहम मजुमदार, शिवंकीत परिहार आणि काशवी मजमुदार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. 'सिटाडेल: हनी बनी' 7 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रीमियर भारतात आणि जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये प्रीमियर होणार आहे.
हेही वाचा :