ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हानं पोस्ट केला तिच्या लग्नातील सलमान खान, रेखासह सेलेब्रिटींचा व्हिडिओ - Sonakshi Sinha wedding - SONAKSHI SINHA WEDDING

Sonakshi Sinha wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा विवाहसोहळा गेल्या काही दिवसापूर्वी खूप चर्चेचा विषय ठरला होता. अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावलेल्या या लग्नाचा व्हिडिओ सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Sonakshi and Zaheer Iqbal wedding
सोनाक्षी आणि झहीर इक्बालचा विवाह (aslisona and iamzahero instagram / ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 9:56 AM IST

मुंबई - Sonakshi Sinha wedding : काही दिवसापूर्वी 23 जून रोजी एका छोटेखानी समारंभात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा दीर्घकाळचा प्रियकर झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकली होती. तिनं आता तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी आनंद देणारा आहे.

बुधवारी इंस्टाग्रामवर सोनाक्षीनं झहीरबरोबरचा खास क्षणांनी भरलेला व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओची सुरुवात सोनाक्षी आणि झहीरनं पापाराझीसाठी दिलेल्या एन्ट्री आणि फोटो पोजनं केली आहे. क्लिपमध्ये तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा, आई पूनम सिन्हा आणि भाऊ कुश सिन्हा यांच्यासह सिन्हा कुटुंबाची झलक देखील दाखवली आहे.

व्हिडिओमध्ये काजोल, सलमान खान, अनिल कपूर, रेखा आणि रॅपर-गायक हनी सिंगसह अनेक सेलिब्रिटी देखील दिसत आहेत. याशिवाय सोनाक्षीचा 'काकुडा' चित्रपटातील सहकलाकार साकिब सलीम सेलिब्रेशनमध्ये शिट्टी वाजवताना दिसत आहे. एका दृश्यात सोनाक्षीनं काजोलबरोबर सेल्फीसाठी पोज देताना दिसली आहे.

सोनाक्षीने अनिल कपूरबरोबर 'माय नेम इज लखन' मधील आयकॉनिक डान्स स्टेप केल्यामुळे व्हिडिओची खासियत वाढली आहे. यामध्ये ती तिचा 'दबंग' चित्रपटाचा सहकलाकार सलमान खानबरोबर मिठी मारताना दिसली. एका हृदयस्पर्शी प्रसंगात रेखा भावूक झाली आणि सोनाक्षीनं तिची हळुवारपणे 'रोना मत' म्हणत समजूत घातली. व्हिडिओमध्ये हे जोडपं 'मुझसे शादी करोगी', 'तेरी चुनरिया दिल ले गई', 'छैय्या छैय्या' आणि 'धधंग धंग' यांसारख्या लोकप्रिय गाण्यांवर नाचतानाही दिसले.

सोनाक्षी आणि झहीरनं 23 जून रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी प्रियजनांच्या उपस्थितीत लग्न केलं. या विवाहानंतर बास्टियन येथे विवाहसोहळा पार पडला ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.रिसेप्शनला सलमान खान, सिद्धार्थ रॉय कपूरसह विद्या बालन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांच्यासह बॉलीवूडच्या तारकांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, सोनाक्षी 'काकुडा' या आदित्य सरपोतदार दिग्दर्शित चित्रपटामध्ये दिसणार आहे.हा चित्रपट 12 जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि साकिब सलीम देखील आहेत.

हेही वाचा -

  1. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं हनीमूनमधील केले सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर - Sonakshi sinha and zaheer iqbal
  2. सोनाक्षी सिन्हाचे हाय हिल्स पती झहीर इक्बालनं घेतले हातात, युजर्सनं केलं ट्रोल - Sonakshi Sinha
  3. 'तेरे मस्त मस्त दो नैन'वर थिरकले नवविवाहित सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल - Sonakshi Sinha wedding reception

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.