मुंबई - Celebrity Cricket League 2024 : सेलेब्रिटी क्रिकेट लिगच्या ( सीसीएल ) 10 व्या पर्वाला सुरुवात होत असून याचा कर्टन रेझर 2 फेब्रुवारी रोजी दुबईच्या बुर्ज खलिफावर उलगडला जाणार आहे. या वर्षीचा सीसीएल स्पर्धेचा नवा सीझन 23 फेब्रुवारीपासून ते 17 मार्चपर्यंत चालेल. भारतीय चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या प्रांतातील जिगरबाज खेळाडूंचे 8 संघ यामध्ये सामील होतील. या लिगमध्ये हे संघ एकूण 20 सामने खेळणार असून 10 ओव्हर्सच्या दोन इंनिंग खेळवल्या जाणार आहेत.
23 फेब्रुवारी रोजी सीसीएल स्पर्धेचा पहिला उद्घाटनाचा सामना शारजाहमध्ये मुंबई हिरो विरुद्ध केरळ स्ट्रायकर्स यांच्यात खेळला जाणार आहे. सुरुवातीचे पाच सामने शारजाहच्या मैदानातच खेळले जातील. त्यानंतर भारतातील बंगळूरू, हैदराबाद, चंदिगढ, तिरुअनंतपुरम आणि विशाखापट्टणम या 5 मुख्य शहरात याचे सामने होतील. उपांत्य आणि अंतिम सामने विशाखापट्टणम येथील मैदानात होणार आहेत.
मुंबई हिरोज
कर्णधार: रितेश देशमुख
फिल्म इंडस्ट्री : हिंदी/बॉलिवुड
मालक: सोहेल खान
संघातील खेळाडू : रितेश देशमुख (कर्णधार), सुनील शेट्टी, बॉबी देओल, सलमान खान, आफताब शिवदासानी, समीर कोचर, शरद केळकर, शब्बीर अहलुवालिया, वत्सल सेठ, साहिल चौधरी, इंद्रनील सेनगुप्ता, वरुण बडोला, अपूर्व लखिया, कुणाल खेमिया, राजकुमार खेर , तुषार जलोटा, कबीर सदानंद, साकिब सलीम.
कर्नाटक बुलडोझर
कॅप्टन: किच्चा सुदीप
फिल्म इंडस्ट्री : कन्नड
मालक : अशोक खेणे
संघातील खेळाडू : प्रदीप (कर्णधार). सुनील राव, शिवा राजकुमार, किच्चा सुदीप, गणेश, राजीव एच, अर्जुन योगी, कृष्णा, सौरव लोकेश, चंदन, निरुप भंडारी, जयराम कार्तिक, नंदा किशोर, सागर गौडा, प्रसन्ना.
बंगाल टायगर्स
कॅप्टन: जिशू सेनगुप्ता
फिल्म इंडस्ट्री : बंगाली
मालक: बोनी कपूर
संघातील खेळाडू : जिशू (कर्णधार), सुमन. नंदी, मोहन, जॉय, डेबू, इंद्रशिष, जम्मी, रत्नदीप, जो, विवेक, सँडी, मँटी, सुशील, सुशील, उदय.
तेलुगु वॉरियर्स
कर्णधार: अक्किनेनी अखिल
फिल्म इंडस्ट्री : तेलुगु/टॉलिवुड
मालक: सचिन जोशी
संघातील खेळाडू : अखिल अक्किनेनी (कर्णधार), सचिन जोशी, तरुण, नंदा किशोर, विश्व, साई धरम तेज, सम्राट रेड्डी, खय्युम, आदर्श बालकृष्ण, हरीश, प्रिन्स, तारका रत्न, निखिल, रघु, अश्विन बाबू, सुशांत.
केरळ स्ट्रायकर्स
कर्णधार: कुंचको बोबन
फिल्म इंडस्ट्री : मल्याळम
मालक: राजकुमार, श्रीप्रिया
संघातील खेळाडू : कुंचाको बोबन (कर्णधार). उन्नी मुकुंदन, विवेक गोपन, सैजू कुरूप, मणिकुत्तन, अर्जुन नंदकुमार, सिद्धार्थ मेनन, शफीक रहमान, निखिल के मेनन, विजय येसुदास, प्रजोद कलाभवन, जीन पॉल लाल, संजू शिवराम, आसिफ अली, राजीव पिल्लई, विल्सन अलेक्झांडर, सिजू अलेक्झांडर.
चेन्नई ऱ्हिनोज
कॅप्टन: आर्या
फिल्म इंडस्ट्री : तमिळ
मालक: के. गंगा प्रसाद
संघातील खेळाडू : आर्य (कर्णधार), शिव. पृथ्वी, विष्णू, कलैयरासन, दाशरथी, भरत, विक्रांत, आढाव, शांतनु, रमणा, अशोक सेलवन, बाला सरवणन, जिवा, सत्य, शरण.
भोजपुरी दबंग
कर्णधार : मनोज तिवारी
फिल्म इंडस्ट्री : भोजपुरी
मालक : मनोज तिवारी
संघातील खेळाडू : मनोज तिवारी (कर्णधार), दिनेश लाल यादव (उपकर्णधार), रवी किशन, प्रवेश लाल यादव, उदय तिवारी, राहुल सिंग, अजोय शर्मा, प्रकाश जैस, अयाज खान, सुशील सिंग, अभय सिन्हा, खेसारी लाल यादव, जय. यादव, सूर्या द्विवेदी, विकास सिंग, पवन सिंग, संतोष सिंग, अजय श्रीवास्तव, विक्रांत सिंग राजपूत, अनिल सम्राट
पंजाब दे शेर
कॅप्टन : सोनू सूद
फिल्म इंडस्ट्री : पंजाबी
मालक: नवराज हंस, पुनीत सिंग
संघातील खेळाडू : सोनू सूद (कर्णधार), आयुष्मान खुराना, जिमी शेरगिल, मिका सिंग, बिन्नू धिल्लॉन, राहुल देव, हरमीत सिंग, राजू शर्मा, अंगद बेदी, पीयूष मल्होत्रा, युवराज हंस, गुलजार चहल, अमरिंदर गिल, रोशन प्रिन्स, मनवीर स्रान, नवराज हंस, दिलराज खुराना.
हेही वाचा -