मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खान, सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे, ती आपले फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल अपडेट्स देत असते. आता तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या पापण्यांचा आहे. या फोटोसह तिनं एक नोटही जोडली आहे. हिनाच्या या पोस्टवर एकता कपूरसह इतर टीव्ही स्टार्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री हिना खाननं चाहत्यांना तिची खास झलक दाखवत पोस्टमध्ये लिहिलं, 'माझ्या मोटिवेशनचा सध्याचा स्रोत काय आहे हे जाणून घ्यायचे आहे? माझे अनुवांशिक लांब आणि सुंदर लॅशेज आहे. माझी ही शूर, एकटी योद्धा, माझी शेवटची पापणी माझ्यासह झुंज देत आहे.'
हिना खाननं शेअर केली पोस्ट : हिनानं तिच्या पोस्टमध्ये पुढं लिहिलं, 'जेव्हा मी माझ्या कीमोच्या शेवटच्या सर्कलच्या जवळ पोहचले, यानंतर ही एकटी पापाणी माझी मोटिवेशन बनली. हे सर्व आपण बघू इंशा अल्लाह. एक दशकापासून फेक लॅशेज घातल्या नाहीत. मात्र मला माझ्या शूटसाठी घालावे लागते. सर्व काही ठीक होणार आहे.' या पोस्टवर चित्रपट निर्माती एकता कपूर, अभिनेत्री राखी सावंत, मौनी रॉय यांच्यासह अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी हिनावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. टीव्ही अभिनेत्री जुही परमारनं लिहिलं, 'एक सुंदर मुलगी जिचं मन धाडसी आणि सुंदर आहे.'
हिनाला चाहत्यांनी दिला धीर : याशिवाय अनेक यूजर्सनं तिला धीर देत आपल्या प्रतिक्रिया या पोस्टवर दिल्या आहेत. या पोस्टच्या कमेंट विभागात एका चाहत्यानं 'द लायन लेडी.' लिहिलंय. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, 'तू सुपर स्ट्राँग शेर खान आहेस.' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'तू खूप जास्त मजबूत आहेस, लवकरच बरी होणार आहेस.' हिना खान कर्करोगाशी झुंज देत असताना देखील शूटिंग करत आहे. ती काही दिवसापूर्वी एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली होती. यावेळी ती ब्राइडल लूकमध्ये दिसली होती. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक देखील केलं होतं.
हेही वाचा :