मुंबई -Kalki Screening in BIFF 2024 : साऊथ स्टार प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन अभिनीत 'कल्की 2898 एडी' यावर्षी 9 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींची कमाई केली होती. चित्रपटगृहांनंतर, 'कल्की 2898 एडी' हा ओटीटीवर प्रदर्शित झाला. इथे देखील या चित्रपटानं ध्वज फडकवला. सर्व यशानंतर नाग अश्विनचा चित्रपट बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर होणार आहे. 'कल्की 2898 एडी'चं प्रोडक्शन हाऊस वैजयंती मूव्हीजनं आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी एक बातमी शेअर केली आहे.
बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : 'कल्की 2898 एडी'बद्दल पोस्ट शेअर करताना, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की, 'कल्की 2898 एडी' प्रतिष्ठित बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शनासाठी सज्ज आहे. 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी एपिक ब्लॉकबस्टर पाहा.' बुसान फिल्म फेस्टिव्हल 2024 हे 2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि 11 ऑक्टोबरपर्यंत चालेल. प्रभासचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात येणार आहे. दरम्यान प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण अभिनीत हा चित्रपट विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीच्या जन्मावर आधारित आहे.
'कल्की 2' चित्रपटाबद्दल : 'कल्की 2898 एडी'च्या सीक्वेलबद्दल बोलायचं झालं तर निर्मात्यांनी 'कल्की 2'चं सध्या 25 दिवस शूटिंग केले आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, 'कल्की 2898 एडी'चा सीक्वेल 2027 मध्ये थिएटरमध्ये दाखल होईल. या चित्रपटात दिशा पटानी, प्रभास, अण्णा बेन आणि ब्रह्मानंदम, एसएस राजामौली, विजय देवरकोंडा आणि राम गोपाल वर्मा यांच्याही भूमिका असेल. आता अनेकजण 'कल्की 2'ची आतुरतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटावर सध्या खूप वेगानं काम सुरू आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी' हा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता, त्यामुळे आता अनेकांना 'कल्की 2'पासून देखील हीच अपेक्षा आहे.
हेही वाचा :
- जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या, 'स्त्री 2' ते 'कल्की 2898 एडी'पर्यंतच्या चित्रपटांचं कलेक्शन - World bollywood day
- प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' नेटफ्लिक्सवर चार्टमध्ये अव्वल, येथे संपूर्ण यादी पाहा... - Kalki 2898 AD
- 'कल्की 2898 एडी' निर्मात्यांनी आंध्र प्रदेशला पूरग्रस्तांसाठी दिली 25 लाख रुपयांची मदत - Andhra Pradesh Relief Fund