मुंबई-Boycott IC 814: चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा यांचा 'आयसी 814: द कंधार हाईजॅक' या वीकेंडला रिलीज झाला आहे. या वेब सीरीजला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. आयसी 814: द कंधार हाईजॅक'ला आता सोशल मीडियावर अनेकजण ट्रोल करत आहे. 1999 मध्ये दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण केल्याच्या धक्कादायक घटनेचं चित्रण या वेब सीरीजमध्ये करण्यात आलं आहे . समीक्षकांनी या वेब सीरीजमधील कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केली होती. मात्र अनेक यूजर्सनं या वेब सीरीजला नापसंत केलं आहे. 'आयसी 814: द कंधार हाईजॅक' या वेब सीरीजमध्ये दहशतवाद्यांच्या नावांशी छेडछाड करण्यात आली असल्याचं म्हणण्यात आलं आहे.
Names of IC814 Hijackers changed to Shankar & Bhola by @anubhavsinha
— Stranger (@amarDgreat) September 1, 2024
This is how Bollywood let the TERRORISTS WIN:#BoycottBollywood#IC814TheKandaharHijack
IC814 Names in
Hijackers Webseries pic.twitter.com/lv0xeVgIJu
वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी : आता अनेकजण या वेब सीरीजबाबतीत नाराज आहे. या दहशतवाद्यांची नावे कथित इब्राहिम अथर, शाहिद अख्तर सईद, सनी अहमद काझी, जहूर मिस्त्री आणि शाकीर अशी होती. या वेब सीरीजमध्ये त्यांची नावे भोला, शंकर, डॉक्टर, बर्गर आणि चीफ ही सांकेतिक नावे दिल्याचं या वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे. आता अनेक प्रेक्षक यावर संतप्त झाले आहेत. या वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी अनेकजण करत आहेत. काही लोकांनी गुगलवरून दहशतवाद्यांच्या नावांचा स्क्रीनशॉट घेतला आणि ते शेअर करत लिहिलं, "हे अजिबात सहन करण्यासारखे नाही, तुम्ही दहशतवाद्यांची नावे बदलून भारतीयांची नावे ठेवली. "
Kandahar flight hijackers' original names:
— Rishi Bagree (@rishibagree) August 31, 2024
* Ibrahim Athar
* Shahid Akhtar
* Sunny Ahmed
* Zahoor Mistry
* Shakir
Anubhav Sinha hijacker web series IC 814 depicted as:
* Bhola
* Shankar
This is how whitewashing done cinematically pic.twitter.com/8WPzJqExNO
कंधार फ्लाइट अपहरणकर्त्यांची मूळ नावे:
इब्राहिम अथर
शाहिद अख्तर
सनी अहमद
जहूर मिस्त्री
शाकीर
अनुभव सिन्हाची 'आयसी 814: द कंधार हाईजॅक' वेब सीरीजमधील नाव
भोला
शंकर
डॉक्टर
बर्गर
चीफ
'आयसी 814: द कंधार हाईजॅक' वेब सीरीजची स्टार कास्ट : 'आयसी 814: द कंधार हाईजॅक'मध्ये विजय वर्माशिवाय नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, अरविंद स्वामी आणि दिया मिर्झा यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या वेब सीरीजचं समीक्षकांनी खूप कौतुक केलं आहे. प्रेक्षकांना कलाकारांचा अभिनय देखील उत्कृष्ट वाटला, मात्र ही वेब सीरीज आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही वेब सीरीज 29 ऑगस्ट रोजी रिलीज झाली. 'आयसी 814: द कंधार हाईजॅक' नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे.