ETV Bharat / entertainment

'बॉर्डर 2'ची घोषणा, 27 वर्षांनंतर सनी देओल त्याच्या 'जवानां'सह परतणार - Sunny Deol to - SUNNY DEOL TO

Border 2 Announcement : सनी देओलनं आज 13 जून रोजी त्याच्या 'बॉर्डर 2' चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यानं सोशल मीडियावर टीझर शेअर करत या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे.

Border 2 Announcement
बॉर्डर 2 घोषणा ('बॉर्डर 2' (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 12:11 PM IST

मुंबई - Border 2 Announced : अभिनेत्री सनी देओलनं आज 13 जून रोजी त्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'बॉर्डर 2'ची घोषणा केली आहे. त्यानं 12 जून रोजी सांगिलतं होतं की, उद्या म्हणजेच आज 13 जून रोजी चाहत्यांसाठी तो एक रोमांचक बातमी घेऊन येत आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटावर सध्या जोरदार काम सुरू आहे. आज शक्तिशाली आवाजासह टीझरची घोषणा करण्यात आली आहे. 'बॉर्डर' चित्रपट 13 जून 1997 रोजी प्रदर्शित झाला होता. सनीनं चित्रपटसृष्टीत 2023 मध्ये 'गदर 2' चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं होतं. 'गदर 2' च्या यशानं सनी देओलला बॉलिवूडमधून अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.

'बॉर्डर 2'चा टीझर रिलीज : सनी देओलकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्यात 'सफर', 'लाहोर 1947', 'बॉर्डर 2' आणि 'गदर 3' या चित्रपटाचा समावेश आहे. टीझरमध्ये सनी देओल म्हणतोय, "27 वर्षांपूर्वी एका सैनिकानं वचन दिलं होतं की तो परत येईन, ते वचन पूर्ण करण्यासाठी तो पुन्हा भारताच्या मातीला सलाम करण्यासाठी येत आहे." 'बॉर्डर 2'ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करत आहेत. अनुराग सिंग 'बॉर्डर 2' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाला अनु मलिक आणि मिथुन संगीत देणार आहे. या चित्रपटासाठी जावेद अख्तरनं गाणी लिहिली आहेत. या गाण्यांना सोनू निगम गाणार आहे. सध्या या चित्रपटाची स्टारकास्ट समोर आलेली नाही.

सनी देओलनं शेअर केली पोस्ट : सनी देओलनं 12 जून 2024 रोजी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'उद्या एक रोमांचक घोषणा होणार आहे, तुम्ही गेस करू शकाल का?' , ही पोस्ट पाहताच सनीच्या चाहते 13 जूनची म्हणजेच आजची वाट पाहत होते. चाहत्यांनी सनी देओलच्या पोस्टवर प्रतिक्रया दिल्या होत्या. एका चाहत्यानं पोस्टवर लिहिलं होतं, "लाहोर 1947 पोस्टर." यानंतर अनेक चाहत्यांनी या पोस्टमधील सनी देओलच्या लूकवर फायर इमोजी शेअर केले होते. तसेच दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, आगामी 'बॉर्डर 2' या चित्रपटाचं नाव घेतलं होतं. दरम्यान 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज झालेल्या 'गदर 2'नं बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा व्यवसाय केला होता. 'गदर 2' हा सनीच्या कारकिर्दीतील सर्वात हिट आणि कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

हेही वाचा :

  1. करण ओबेरॉयनं मोना सिंगबरोबरच्या ब्रेकअपबद्दल 18 वर्षांनी केला खुलासा - Karan Oberoi
  2. गोळीबार प्रकरणी सलमान आणि अरबाज खानचे पोलिसांनी नोंदवले जबाब - Salman Khans statement
  3. भारताच्या पहिल्या महिला आयपीएस किरण बेदींच्या बायोपिकची घोषणा, या खास दिवशी होणार रिलीज - BIOPIC ON IPS KIRAN BEDI

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.