ETV Bharat / entertainment

बॉलिवूड स्टार्सना लागलं योगासनांचं वेड, सौंदर्यवतींनी शेअर केले योग करतानाचे फोटो - International Yoga Day 2024 - INTERNATIONAL YOGA DAY 2024

International Yoga Day 2024 : आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 च्या निमित्तानं बॉलिवूड स्टार्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. यामध्ये शिल्पा शेट्टी आणि मलायका अरोरा यांच्याप्रमाणे अनेक अभिनेत्रींनीही त्यांच्या चाहत्यांना फिट राहण्याचा संदेश दिला आहे.

International Yoga Day 2024
आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 ((IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 12:52 PM IST

मुंबई - International Yoga Day 2024 : जगभरात आज २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्तानं लोक योगासनं करत आहेत आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकत आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टार्सही या बाबतीत मागं नाहीत. बॉलीवूडच्या फिटनेस क्वीन्समध्ये शिल्पा शेट्टी आणि मलायका अरोरा यांचे नाव आघाडीवर आहे आणि आता अनेक अभिनेत्रींनाही या यादीत सामील व्हायचं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 रोजी, कियारा अडवाणी, रकुल प्रीत सिंग, शिल्पा शेट्टी, निकिता दत्ता आणि सलमान खान यांच्या चित्रपटात दिसणारी अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल हिनं देखील सोशल मीडियावर योग करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

International Yoga Day 2024
आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 ((IMAGE - KIARA Insta))

बॉलिवूड स्टार्सना लागलं योगासनांचं वेड

बॉलिवूड स्टार अनुपम खेर यांनीही एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते योगा आणि व्यायाम करताना दिसत आहेत. बॉलिवूडचे सुंदर नवीन जोडपं रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी एकत्र योग करतानाचा फोटो शेअर केला आहे. शाहिद कपूरबरोबर कबीर सिंग या चित्रपटात दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्ता हिनेही योगच्या पोजमध्ये स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची स्टार पत्नी कियारा अडवाणीनं देखील तिचा योग करतानाचा फोटो शेअर केला आहे आणि तिच्या चाहत्यांना आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 च्या शुभेच्छा दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 चा उत्साह बॉलिवूड स्टार्समध्ये स्पष्टपणे दिसून येतो. शिल्पा शेट्टी आणि मलायका अरोरा या दोघीही अभिनेत्री रोज व्यायाम आणि योगासनं करतात. दोघीही फिटनेस क्वीन वेलनेस सेंटरसाठी काम करतात.

हेही वाचा -

  1. "हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले" या पंक्तींप्रमाणे आज आपल्या हृदयाची अवस्था..; ज्येष्ठ गायक हृदयनाथ मंगेशकर - Shivacharitra Ek Soneri Paan song
  2. 'भिडू... योग करने का, मस्त रहने का' प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुंबईकरांना संदेश - World Yoga Day
  3. शत्रुघ्न सिन्हांनी सोनाक्षीच्या लग्नापूर्वी घेतली होणाऱ्या जावयाची भेट, झहीर इक्बालबरोबरचा सिन्हांचा व्हिडिओ व्हायरल - Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.