ETV Bharat / entertainment

'बॉडीगार्ड' फेम अभिनेत्री हेजल कीचसाठी पती युवराज सिंगनं केली सुंदर पोस्ट शेअर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 4:34 PM IST

Bodygaurd Actress Hazel Keech Birthday: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगची पत्नी हेजल किचचा आज वाढदिवस आहे. या खास दिवशी युवराजनं पत्नीसाठी एक सुंदर पोस्ट केली आहे.

Bodygaurd Actress Hazel Keech Birthday
बॉडीगार्ड अभिनेत्री हेजल कीचचा वाढदिवस

मुंबई - Bodygaurd Actress Hazel Keech Birthday : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगसाठी आजचा दिवस खूप विशेष आहे. आज युवराज सिंग पत्नी हेजल कीचचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी युवराज सिंगनं आपल्या पत्नीसाठी एक गोड वाढदिवसाची पोस्ट शेअर केली आहे. युवराज सिंगनं आपल्या पत्नीसाठी वाढदिवसाच्या या पोस्टबरोबर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या जोडप्याचे सुंदर फोटो आहेत. युवराजने शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. दरम्यान हेजल कीच अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' या चित्रपटातून हेजलला लोकप्रियता मिळाली.

युवराज सिंगनं पत्नीला शुभेच्छा दिल्या : आज 28 फेब्रुवारी रोजी युवराज सिंगनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं आहे की, ''माझ्या दोन लहान ‘जलेबी बाळांसह’ आयुष्य खूप मजेदार आहे. तुमचा वाढदिवस एक उत्कृष्ट आई म्हणून साजरा करत आहे! सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे आम्ही या पोस्टद्वारे आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण शेअर केले आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेबी, तुझ्यावर खूप प्रेम आहे.'' यासह त्यानं यावर हार्ट आणि इमोजी पोस्ट केले आहेत. हेजल युवराज सिंगबरोबर अनेकादा पार्ट्यामध्ये दिसते. याशिवाय ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

युवराज-हेजलचे लग्न आणि मुले : युवराज सिंह आणि हेजल कीच यांचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. यानंतर त्यांना 25 जानेवारी 2022 रोजी ओरियन आणि 25 ऑगस्ट 2023 रोजी मुलगी ऑरा झाली. हेजल लग्नानंतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. 2016 मध्ये ती 'बांके की क्रेजी बारात' या चित्रपटात दिसला होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन ऐजाझ खान यांनी केलं होतं. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर राजपाल यादव, टिया बाजपेयी, संजय मिश्रा, विजय राज , सत्यजीत दुबे, पंकज झा आणि इतर कलाकार होते. हेजल 'कॉमेडी सर्कस' (2012), 'झलक दिखला जा 6' (2013) आणि 'बिग बॉस 7' (2013) मध्ये दिसली आहे.

हेही वाचा :

  1. पोलिसांच्या गणवेशात रजनीकांतची स्टायलिश एन्ट्री, 'वेट्टयान'च्या सेटवरील व्हिडिओ व्हायरल
  2. साऊथ अभिनेत्री सौम्या जानूचा ट्रॅफिक होमगार्डवर हल्ला, रस्त्यातील राड्याचा व्हिडिओ व्हायरल
  3. आउटसाइडरला बॉलिवूडमध्ये कशी वागणूक दिली जाते याचा शाहिद कपूरनं केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.