ETV Bharat / entertainment

बॉबी देओलनं पत्नी तान्या देओलसोबतचा सुंदर फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bobby Deol's sweet birthday post for wife : अभिनेता बॉबी देओलची पत्नी तान्या आहुजा देओलचा आज वाढदिवस आहे. याप्रसंगी त्यानं एक सुंदर पोस्ट शेअर करून पत्नीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Bobby Deol
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 4:56 PM IST

मुंबई - Bobby Deol's sweet birthday post for wife : 'अ‍ॅनिमल' फेम बॉबी देओलचं नशीब पुन्हा एकदा चमकलं आहे. त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वप्नवत कमबॅक केलं. बॉबीने 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील 15 मिनिटांच्या भूमिकेनं जगभरात प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत जरी रणबीर कपूर असला तरी बॉबीचं 'अ‍ॅनिमल'साठी अनेकांनी कौतुक केलं आहे. बॉबीचं या चित्रपटामधील 'जमाल कुडु' हे गाणं खूप लोकप्रिय झालं. त्यानं 'अ‍ॅनिमल'मध्ये साकारलेल्या अबरार हकला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. दरम्यान आज 24 जानेवारी रोजी बॉबी देओलची पत्नी तान्या आहुजा देओलचा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी बॉबीनं तान्यासाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

तान्या देओलचा वाढदिवस : बॉबीनं आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलं, ''माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' बॉबी एक चांगला अभिनेता असण्याबरोबरच एक प्रेमळ पती देखील आहे, मात्र 'अ‍ॅनिमल'मध्ये त्याची भूमिका त्याच्या व्यक्तिमत्वाच्या पूर्णपणे विरुद्ध होती. बॉबी अनेकदा आपल्या पत्नीबरोबर सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यानं शेअर केलेल्या फोटोवर आता अनेकजण कमेंटस् करून तान्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या फोटोमध्ये बॉबी आपल्या पत्नीला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत.

बॉबी आणि तान्याची प्रेमकहाणी : बॉबी आणि तान्या यांची लव्हस्टोरी कोणापासून लपलेली नाही. हे दोघे एका इटालियन कॅफेमध्ये पहिल्यांदा मित्राच्या पार्टीत भेटले होते. पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडला. ही पार्टी झाल्यानंतर त्यानं त्याच्या मैत्रिणीकडे तान्याचा नंबर मागितला आणि तिला दुसऱ्या भेटीसाठी विचारलं. यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. 30 मे 1996 रोजी बॉबीनं जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह केला. दोघांना आर्यमन आणि धरम ही दोन मुलं आहेत. दरम्यान 'अ‍ॅनिमल'नंतर बॉबी तामिळ भाषेतील अ‍ॅक्शन चित्रपट 'कंगुवा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दिशा पटानी आणि सूर्यादेखील आहेत. यानंतर तो 'हरी हर वीरा मल्लू ' या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर पवन कल्याण दिसेल.

हेही वाचा :

  1. ऑस्कर नामांकनात निशा पाहुजा दिग्दर्शित 'टू किल अ टायगर' ची झाली एंट्री
  2. अजय देवगण स्टारर हॉरर चित्रपट 'शैतान'ची रिलीज डेट जाहीर
  3. सारा अली खाननं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला दिली भेट; पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.