मुंबई Bobby Deol In Thalapathy 69 : साऊथ अभिनेता विजय स्टारर 'थलपथी 69'चे निर्माते आज, 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता सोशल मीडियावर एक विशेष घोषणा करणार आहेत. या चित्रपटाची नवीन अपडेट रिलीज होण्याआधी, एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, थलपथी विजयबरोबर बॉबी देओल देखील त्याच्या आगामी चित्रपटामध्ये असणार आहे. अलीकडेच केव्हीएन (KVN) प्रोडक्शननं थलपथी विजयच्या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा केली होती. या चित्रपटाला तात्पुरतं शीर्षक 'थलपथी 69' देण्यात आलं आहे. प्रॉडक्शन हाऊसनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून या बातमीला दुजोरा दिला आहे.
'थलपथी 69'मध्ये होईल बॉबी देओलची एन्ट्री : इंस्टाग्रामवर घोषणेचा व्हिडिओ शेअर करताना केव्हीएन (KVN) प्रॉडक्शन्सनं लिहिलं, "थलपथीसाठी प्रेम, आम्ही सर्व तुमच्या चित्रपटांसह मोठे झालो आहोत आणि तुम्ही प्रत्येक टप्प्यावर आमच्या जीवनाचा एक भाग आहात. 30 वर्षांहून अधिक काळ आमचे मनोरंजन केल्याबद्दल थलपथी धन्यवाद." दरम्यान विजयच्या शेवटच्या 'थलपथी 69' चित्रपटात बॉबी देओलला खलनायकच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. या बातमीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र 'कांगुवा'मधील अभिनयानंतर बॉबीची लोकप्रियता साऊथमध्ये वाढली आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही, पण सूर्याच्या चित्रपटातील आदिवासी नेत्याच्या भूमिकेत बॉबीचा थरारक अवतार प्रेक्षक आणि निर्मात्यांना भावला आहे.
'थलपथी 69'बद्दल येणार मोठी बातमी : एच विनोथद्वारा दिग्दर्शित 'थलपथी 69'च्या कास्टिंगबद्दल अफवा व्हायरल होत आहेत, अनेक लोक असेही म्हणतात की पूजा हेगडे, मोहनलाल आणि ममिता बैजू यासारखे कलाकार या चित्रपटात झळकतील. अद्याप निर्मात्यांनी विजयशिवाय इतर कोणत्याही नावाची पुष्टी केलेली नाही. या चित्रपटाच्या नवीन अपडेटसाठी चाहते उत्सुक आहेत. आज 14 सप्टेंबर रोजी या चित्रपटाबद्दल मोठी घोषणा होणार आहे. दरम्यान, विजय स्टारर नुकताच रिलीज झालेला 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' हा चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. व्यंकट प्रभू दिग्दर्शित, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर अनेक उत्कृष्ट रेकॉर्ड बनवले आहेत.
हेही वाचा :